उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी येणाऱ्या दुधाची 1 लीटरची किंमत बघून व्हाल आश्चर्यचकित..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी हे कायम चर्चेत असतात. नामाकिंत व्यक्ती म्हणल्यावर अनेक त्यांच्या चाहत्यांना अथवा अनेक लोकांना त्यांच्याविषयी जाणून घेणे अधिक उत्साह वाटत असते. एक आश्चर्याची बाब म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घरी दूध (milk) कोणत्या डेअरीतून येतं आणि त्याची किंमत किती आहे ते जाणून घ्या.

पुण्यातील देवेंद्र शहा यांच्या भाग्यलक्ष्मी डेअरीमधून मुकेश अंबानी यांच्या घरी दूध येतं. अवघ्या ३ तासात दूध मुंबईत पोहोचतं. मुंबईतील अनेक घरामध्ये या दुधाचा पुरवठा केला जातो. मुख्यतः म्हणजे या दुधाचा दर १५० रुपये लिटर आहे. या डेअऱीचे फक्त मुंबई-पुणे शहरात १६ ते १८ हजार इतके ग्राहक आहेत. ज्यात मुकेश अंबानी यांच्यासह अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर हे देखील याच डेअरीतून दूध घेतात.

डेअरीची खासियत..

देवेंद्र शहा यांच्या भाग्यलक्ष्मी डेअरीतील व्हॅन (VAN) रोज सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत लोकांच्या घरोघरी दूध पुरवठा करते. ग्राहकांसाठी एक खास लॉगीन ID दिलेला असतो. त्या माध्यमातून ते ऑर्डर करू शकतात, कॅन्सल करू शकतात, बदलू शकतात तसेच वेगळ्या अड्रेसवर मागवू शकतात. इथे गायींची विशेष काळजी घेतली जाते देखभाल केली जातेय. स्वछता केली जातेय. गायींसाठी इथे रबर मॅट आहेत. जे दिवसातून ३ ते ४ वेळा स्वच्छ केले जातात. तसेच, गायींना पिण्यासाठी RO चं पाणी मिळतं. गायींना चारा म्हणून सोयाबीन, अल्फा गवत हंगामी भाज्या आणि मक्याचा चारा दिला जातो. विशेष बाबा म्हणजे या डेअरीमध्ये २४ तास हळू आवाजात संगीत सुरू असतं.

दरम्यान भाग्यलक्ष्मी डेअरी प्रोजेक्टमध्ये शहा यांनी १५० कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. आता ते याला वाढवण्याचा विचार करत आहेत. इथे २ हजार डच होल्स्टीन प्रजातीच्या गायी आहेत. ही डेअरी २६ एकरात बनली असून येथून रोज २५ हजार लीटर दुधाचं उप्तादन होतं. इथे रोज सकाळी २ हजार गायींचं दूध काढलं जातं. इथे जवळपास सगळी कामे म्हणजे गायीचं दूध काढण्यापासून ते दुधाचे पॅकिंगपर्यंत मशीन करतात.