कोट्यवधीश असलेल्या महिलेचे बचतीचे ‘मार्ग’ वाचून चक्रावून जाल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  प्रत्येकाची श्रीमंत होण्याची इच्छा पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. श्रीमंत होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागते हे अमेरिकेतील लॉस वेगासमधील Aimee Eliabeth या महिलेकडून पाहून लक्षात येतं. एलिजाबेथची एकूण संपत्ती ३८ कोटी रूपये असून तिने यासाठी किती कष्ट घेतले हे टीव्हीवरील एका कार्यक्रमात तिने सांगितले. इंडिया टाइम्सनुसार, ती कधी अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च करत नाही. इतकंच काय तर किराण्याचं बिल कमी करण्यासाठी तिने अनेक मांजरीला खायला दिले जाणारे पदार्थही खाल्ले आहेत. हे वाचून तुम्ही हैराण व्हाल आणि वाचून असाही विचार कराल की, श्रीमंत लोक असंही करतात?

५० वर्षीय एलिजाबेथने सांगितले की, ती महिन्याला १ हजार डॉलर(७२ हजार)पेक्षा जास्त पैसे खर्च करत नाही. ‘मी माझं पाण्याचं हिटर बंद ठेवते. २२ मिनिटात पाणी गरम होतं. जेव्हा मी उठते तेव्हाच ते सुरू करते. मी यात जास्त वेळ घालवत नाही. ती नवीन वस्तू फार कमी खरेदी करते. यातून ती रोज ८० डॉलर वाचवते. वर्षातून साधारण ती २००,०० डॉलर(१ कोटी ४५ लाख रूपये) यातून बचत करते.

एलिजाबेथने या शोमध्ये अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत. ती पती मायकलपासून वेगळी राहते. त्यानेच तिला घर दिलं असून येथील सफाईची व्यवस्थाही त्यानेच करून दिली आहे. यातून तिचं लाखोंचं बिल वाचतं. तिने या शोमध्ये हेही स्वीकारलं की, लाइट ग्रेवीमध्ये चिकन आणि टुना अनेकदा पाहुण्यांना खाऊ घातलंय. हेच तिची मांजर खाते. ती सांगते की, लोकांना हे विचित्र वाटू शकतं. पण तिला काही फरक पडत नाही. यातून पैसे वाचतात.

१७ वर्ष जुनी कार वापरते

एलिजाबेथला कामानिमित्ताने अनेकदा लॉस एंजलिसला जावं लागतं. पण ती आजही तिची १७ वर्ष जुन्या कारने प्रवास करणं पसंत करते. यात तिला वेळ जास्त लागतो पण नवीन कारचे तिचे लाखो रूपये वाचतात. एकूणच एलिजाबेथने सांगितलेल्या गोष्टीवरून असं वाटतं की, श्रीमंत होणं किती कठिण असतं ते…..