केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी-पेन्शनर्सला मिळू शकतो महागाई भत्ता, अनेक महिन्यांपासून लावलाय प्रतिबंध

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी एक खुशखबर आहे. अपेक्षा आहे की, सरकार त्यांना महागईच्या सध्याच्या 28 टक्केच्या दराने महागाई भत्ता ( Dearness Allowance) आणि महागाई डीआर देईल. यामुळे केंद्र सरकारचे 49.63 लाख कर्मचारी आणि 65.26 लाख पेन्शनर्सला फायदा होऊ शकतो. कर्मचार्‍यांचे असोसिएशन कॉन्फडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अँड वर्कर्सने अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या समोर सरकारी खजिन्याचा लेखाजोखा मांडला आहे. सोबतच विनंती केली आहे की, आता सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सला सध्याचा महागाई दर 28 टक्केच्या हिशेबाने महागाई भत्ता ( Dearness Allowance) दिला जावा.

आर्थिकस्थितीत झाली सुधारणा
देशात आता स्थिती चांगली होत आहे. कोविड-19 मुळे अनेक महिन्यांपासून स्थिती ठीक नव्हती. परंतु, आता कोविडबाबत स्थितीत सुधारणा होत आहे.

औद्योगिक उत्पादनात 3.6 टक्केची वाढ नोंदली गेली आहे. मार्च 2020 मध्ये 97,597 कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले होते, तर डिसेंबर 2020 मध्ये हा आकडा 1,15,000 कोटी रूपयांवर पोहचला आहे.

या सुधारणांचा संदर्भ देत कर्मचार्‍यांच्या असोसिएशनने सरकारला म्हटले आहे की, त्यांनी महागाई भत्ता आणि महागाई मदत आता द्यावी, यासाठी जुलै 2021 पर्यंत वाट पाहू नये.

महागाई भत्त्यावर लावला आहे प्रतिबंध
एप्रिल 2020 मध्ये सरकारने कर्मचारी आणि पेन्शनर्सला मिळणार्‍या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावला होता. सरकारने कोरोना संसर्गाचा अडचणीचा काळ पाहता हा निर्णय घेतला होता. सरकारने जुलै 2021 पर्यंतसाठी प्रतिबंध लावला आहे.