Ministry of Education : सरकारची मोठी घोषणा, आता वर्षात दोन वेळा होणार बोर्डाची परीक्षा! असा लागेल निकाल

नवी दिल्ली : Ministry Of Education | शिक्षण क्षेत्रात शिक्षण मंत्रालयाकडून सातत्याने बदल केले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज शालेय शिक्षण-परीक्षांबाबत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. (Ministry Of Education)

या घोषणा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या तरतुदींना लागू करत करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार आता बोर्ड परीक्षांचे आयोजन वर्षातून दोन वेळा होईल. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ही सवलत असेल की ते दोन्ही सत्रांच्या परीक्षांपैकी मिळालेल्या चांगल्या गुणांना अंतिम मानू शकतील.(Ministry Of Education)

बोर्डाची परीक्षा सर्व बोर्डांकडून वर्षात एकदाच आयोजित केली जाते. शिक्षण मंत्रालयाने नवीन परीक्षा पॅटर्न आधारित बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांची विषयांबाबत समज व स्पर्धात्मक कामगिरीचे मुल्यमापन करेल. याशिवाय वर्गात वह्या पूर्ण करण्याची सध्याची पद्धत टाळता येईल. सोबतच वह्यांचा खर्च कमी केला जाईल. सोबत स्कूल बोर्ड योग्य वेळेत ‘ऑन डिमांड’ परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करतील.

दोन वेळा होईल बोर्डाची परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट ही आहे की, वर्षात दोन वेळा परीक्षेच्या आयोजनानंतर तेच गुण अंतिम मानले जातील, जे जास्त असतील.

आता स्ट्रीम निवडण्याचे बंधन नाही

शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या बदलांनुसार इयत्ता ११ वी आणि इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना आता स्ट्रीम निवडण्याचे बंधन हटवण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना या वर्गांमध्ये आपल्या पसंतीचे विषय निवडण्याची सूट असेल. याशिवाय शिक्षण मंत्रालयाने हे सुद्धा सांगितले की, विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. इयत्ता ११वी आणि १२वीमध्ये किमान एक भाषा भारतीय असावी. २०२४ मध्ये पाठ्यपुस्तके विकसित केली जातील. सध्याच्या स्थितीत सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, व्होकेशनल इत्यादीपैकी एक निवडावे लागते.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटले…

राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा निरीक्षण आणि एनएसटीसी समितीच्या संयुक्त कार्यशाळेदरम्यान
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, कस्तूरीरंगन यांच्या मार्गदर्शनाखाली
सुकाणू समितीने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे.
तो त्यांनी सरकारकडे सुपूर्द केला आहे.

एनसीईआरटीकडून दोन समित्या, राष्ट्रीय तपासणी समिती आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि
पाठ्यपुस्तक समिती (एनएसटीसी) बनवण्यात आली आहे. या दोन्ही समित्या २१ व्या शतकाच्या गरजांच्या आधारावर
आणि मुळ भारतीय विचारसरणीवर आधारित अभ्यासक्रम तयार करतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली