मिर्झापूर वेब सीरिजची PM मोदी आणि CM योगी यांच्याकडे तक्रार, अनुप्रिया पटेल म्हणाल्या – ‘जिल्ह्याला करतायेत बदनाम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मिर्झापूर वेब सीरीजच्या दुसऱ्या सीजनची प्रतीक्षा चाहत्यांना गेल्या 2 वर्षांपासून होती, जी 22 ऑक्टोबरच्या रात्री संपली. ही सिरीज प्राइम व्हिडीओवर येताच लोक ती पाहण्यास तुटून पडले आणि याबद्दल सोशल मीडियावर टिप्पण्यांचा पूर आला. सर्व चाहत्यांनी मिर्जापूर 2 लाईक केले असून त्याबद्दल बरेच ट्विट केले आहे. मात्र, आता मिरजापूर ही वेब सीरीज अडचणीत सापडली आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर जिल्ह्याचे खासदार अनुपिया पटेल यांनी मिर्झापूर वेब सीरिजला हिंसक म्हणत असून त्याविरोधात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टॅग केले आणि या मालिकेच्या चौकशीची मागणी केली.

शोमध्ये शहराला म्हंटले हिंसक ?
अनुप्रिया पटेल यांनी ट्वीट केले की, ‘माननीय पंतप्रधान @narendramodi जी आणि मा. मुख्यमंत्री @ myogiadityanath जी यांच्या नेतृत्वात मिर्जापूर विकासाच्या अधीन आहे, हे सामंजस्याचे केंद्र आहे, मिरजापूर नावाच्या वेब सीरिजच्या माध्यमातून याला हिंसक क्षेत्र असल्याचे म्हणत बदनाम केले आहे. या मालिकेतून जातीय असंतोषही पसरविला जात आहे. आपल्या पुढच्या ट्विटमध्ये अनुप्रियाने लिहिले की, ‘ मिर्जापुर जिल्ह्याची खासदार या नात्याने माझी मागणी आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे @ PrakashJavdekar @narendramodi @myogiadityanath.’

दरम्यान, मिर्झापूर वेब सीरीज 22 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली होती. ही सीरीज 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होती, परंतु काही तासांपूर्वीच ती प्रदर्शित झाली. मिर्जापूर 2 मध्ये दिवेन्दु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि पंकज त्रिपाठी असे कलाकार आहेत. तसेच काही नवीन कलाकारही या मालिकेचा एक भाग बनले आहेत. याचे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि मिहिर देसाई यांनी केले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी त्याचे निर्माते आहेत.