Missing Titanic Submarine | बेपत्ता टायटन पाणबुडीतील 5 जणांचा मृत्यू; स्फोटानंतर आढळले अवशेष

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Missing Titanic Submarine | टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या आणि प्रवासाच्या सुरुवातीच्या 45 व्या मिनिटापासूनच संपर्क तुटलेल्या टायटन या पाणबुडी बाबतची (Missing Titanic Submarine) मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये 18 जून रोजी OceanGate या कंपनीच्या टायटन पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांचा मृत्यू (Five Passengers Died) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचे आढळून आले आहे. पाणबुडीच्या स्फोटात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे अवशेष (Wreck Of The Titanic) पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी रविवारी बेपत्ता (Missing Titanic Submarine) झाली होती. यानंतर लगेचच अमेरिका आणि कॅनडा (America and Canada) दोन्ही देशाच्या नौदलाकडून शोधकार्य सुरु होते. युएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली 22 फूट टायटन पाणबुडीच्या शोधात असलेल्या शोध आणि बचाव पथकांना गुरुवारी सकाळी टायटॅनिकच्या अवशेषांच्या जवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडली आहेत. टायटन पाणबुडीवरील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ओशनगेट (OceanGate) या कंपनीने दिली.

टायटॅनिकच्या जहाजाच्या अवशेषांपासून सुमारे 1,600 फूट अंतरावर समुद्राच्या तळावर बेपत्ता पाणबुडीचे अवशेष आढळले. या अवशेषां नुसार, प्रेशर चेंबरमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले आहे. याबाबत अधिकृत माहिती तपासानंतर समोर येईल. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टायटन पाणबुडीचा स्फोट नेमका कधी झाला हे सांगणे सध्या कठीण आहे. यूएस कोस्ट गार्डचे रिअर अ‍ॅडमिरल जॉन मॅगर (Admiral John Mager) यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, अपघातग्रस्त टायटन पाणबुडीमध्ये ओशनगेट एक्स्पिडिशन्सचे संस्थापक आणि सीईओ स्टॉकटन रश
(CEO Stockton Rush), ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग (Hamish Harding),
प्रसिद्ध फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट (Diver Paul-Henri Nargolet), पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद
(Shahjada Dawood) आणि त्याचा मुलगा सुलेमान (Solomon) (वय, 19) हे पाच जण होते.
याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title :  Missing Titanic Submarine | all five passengers on submersible dead after catastrophic implosion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globally