MLA Aaditya Thackeray | … तर प्रत्येक शहराच्या महापौरांना मंत्रालयात दालन द्या, BMC मधील पालकमंत्र्यांच्या केबिनला आदित्य ठाकरेंचा विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) बाजार समिती (Market Committee) आणि शिक्षण समितीच्या केबिन (Education Committee Cabin) पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना (Guardian Minister) दिल्या आहेत. शिंदे सरकारच्या (Shinde Government) आदेशाने महापालिका प्रशासनानं मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी जोरदार विरोध केला आहे. तसेच 24 तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशारा आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) म्हणाले, महापालिका कायदा 1888 (Municipalities Act 1888) नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्य़रत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. पालकमंत्र्यांचा थेट संबंध जिल्हाधिकाऱ्यांशी (District Collector) येतो. मात्र महापालिकेत पालकमंत्र्यांना केबिन देऊन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारचा सुरु झाला आहे. बिल्डिंग प्रपोजलच्या कामासाठी मंत्र्यांना केबिन दिली जात असतील तर माझी मागणी आहे की, प्रत्येक शहराच्या महापौरांना (Mayor) मंत्रालयात केबिन द्या. आम्हा मुंबईच्या सगळ्या आमदारांना महापालिकेने केबिन द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करुन दादागिरी
करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे 24 तासात थांबलं नाही, केबिन खाली केली नाही तर कधी ना
कधी तरी मुंबईकर राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल माहीत नाही, असं ठाकरे यांनी म्हटले.

MLA Aaditya Thackeray

काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांना मुख्यालयात ऑफिस देण्यात आले आहे.
मुंबई शहर आणि उपनगर असे दोन पालकमंत्री मुंबईला आहेत. मुंबई शहरासाठी दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
तर उपनगरसाठी मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याकडे जबाबदारी आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मंगलप्रभात लोढा यांची केबिन पाहायला मिळाली.
पालिकेने शिक्षण समिती, बाजार समिती केबिनला पालकमंत्र्यांच्या नावाची पाटी लावली आहे.
त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

Pune: CP Ritesh Kumar takes action against inter-district gang leader Amol Shelar and his three aides under MCOCA; CP has taken action against 38 gangs so far

Pune: Hadapsar Vidhan Sabha constituency initiate voter registration campaign in Housing Society on Saturday & Sunday