MLA Disqulification Case | आमदार अपात्रता प्रकरण : ‘या’ कारणासाठी विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात राजीनामा, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

नागपूर : MLA Disqulification Case | सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session 2023) सुरू असले तरी सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqulification Case) निर्णय घ्यायचा असल्याने अध्यक्ष अधिवेशनादरम्यान सुनावणी देखील घेत आहेत. मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker Rahul Narvekar) राजीनामा देऊ शकतात, असे पवार यांनी म्हटले आहे. या पाठीमागील कारण देखील त्यांनी सांगितले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, संविधानानुसार अध्यक्षांना निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) विरोधात जाईल. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर राजकीय अडचण होऊ शकते. त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. निर्णय घेण्याची वेळ आल्यावर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास आश्चर्य वाटायला नको. (MLA Disqulification Case)

रोहित पवार म्हणाले, त्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी वेळ जाईल. तेव्हा सरकारकडून वेळकाढूपणा केला
जाऊ शकतो. एकनाथ शिंदेंच्या विरोधात अध्यक्षांनी निर्णय दिला, तर राजकीय फटका बसू शकतो.
म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात. विधानसभा अध्यक्ष न्याय देऊ शकतील, असे वाटत नाही.
न्यायालयच न्याय देऊ शकेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Winter Session 2023 | संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय

ACB Trap News | लाच स्वीकारताना नगरपरिषदेचे मुख्यअधिकरी व विद्युत पर्यवेक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात