MLA Jitendra Awhad | वाढदिवसाच्या दिवशीच आव्हाड भावनिक! “माफ करा, मी अस्वस्थ आहे… कुणालाही भेटू इच्छित नाही”

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांचा आज (5 ऑगस्ट) वाढदिवस (Birthday) आहे. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे आणि मुंब्रा (Thane And Mumbra) परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळपासूनच त्यांना त्यांचे चाहते, हितचिंतक आणि कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी घरी येत असतात. मात्र यावर्षी आव्हाड वाढदिवस साजरा करणार नसल्याचे कळते. कारण आव्हाड यांनी ट्वीट करून तशी माहिती दिली आहे.

“माफ करा, मी अस्वस्थ आहे. मी कुणालाही भेटू इच्छित नाही,” असे जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच मी अस्वस्थ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आव्हाड यांनी पहिल्यांदाच वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

आव्हाडांनी ट्वीटमध्ये काय म्हटले आहे?

5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही. (Jitendra Awhad tweet)

देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार,
महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.

तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे.
पण तरिही मला माफ करा. मी शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून ते शनिवारी रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून
मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात.
ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे.
आणि हे सगळे बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा.
मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आव्हाड म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

5 August Rashifal : वृश्चिक राशीवाल्यांना होईल व्यवसायात लाभ, जाणून घ्या इतर राशींची स्थिती

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या