MLA Ravindra Dhangekar | विकास निधीवरुन आ. रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर आरोप; ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघांचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पत्रकार परिषद घेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Assembly Constituency) विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारतर्फे (State Government) 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी हा निधी राज्य सरकारतर्फे देण्यात आला होता. मात्र हा निधी आता पर्वती मतदारसंघाकडे वळवण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा 10 कोटींचा निधी पर्वती मतदारसंघाकडे वळवण्यामागे चंद्रकांत पाटील आहेत. त्यांच्या हस्तेक्षेपामुळे हा निधी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. लवकरात लवकर कसब्याला निधी न दिल्यास पालकमंत्र्यांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत निधी वळवण्याबाबत त्यांचे मत मांडले आहे. धंगेकर म्हणाले की, “कसबा विधानसभा पोटनिवडणूक होऊन आता सात महिन्यांचा काळ उलटला आहे. त्या काळात मी राज्य सरकारकडे 100 विकास कामे सुचवली होती. ती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून दहा कोटींचा निधी मंजूर झाला होता. पण अचानक हा निधी पालकमंत्र्यांनी पर्वती मतदार संघाकडे वळवल्याची माहिती समोर आली. या कृतीमधून तरी हे दिसून येत आहे की भाजपाच्या नेत्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. या कृतीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. तुम्ही माझा अपमान करा, तो मी अपमान सहन करेल. पण माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे शहरातील ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमासाठी जातील, त्या ठिकाणी मी आंदोलन करून त्यांना जाब विचारणार.” असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा देखील इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. धंगेकर म्हणाले की, “या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी स्वतः लक्ष घालावे. आणि निधीबाबत लवकरात लवकर निर्णय़ द्यावा. पण त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून निर्णय न घेतल्यास चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार.” असा इशारा देखील आमदार धंगेकर यांनी दिला आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात आली.
यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपा (BJP Pune) धुव्वा उडवत विजय मिळवला. सात महिन्यांपूर्वी झालेली
ही पोटनिवडणुकीची लढत खूप गाजली होती. मात्र अजूनही भाजप नेते असे राजकारण करत असल्याचा आरोप
आता आमदार रवींद्र धंगेकरांकडून (MLA Ravindra Dhangekar) केला जातो आहे.
पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार या भाजपाच्या माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) आहेत.
राज्य सरकारकडून कसब्यासाठी देण्यात आलेला निधी हा भाजपाच्या
आमदार माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघाकडे वळवण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mahavitaran News | खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा ! औंध, बाणेर, बालेवाडीमध्ये 40 हजार वीजग्राहकांना मनस्ताप