MLA Siddharth Shirole | महिन्यातून दोनदा क्षेत्रीय कार्यालयात बैठका घेऊ; आमदार शिरोळे यांचा संकल्प

पुणे – MLA Siddharth Shirole | नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील (shivaji nagar vidhan sabha constituency) क्षेत्रीय कार्यालयांमध्ये महिन्यातून दोनदा बैठका घेण्याचा संकल्प आमदार शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी आज (गुरुवारी) जाहीर केला.

औंध आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात वार्ड ऑफिसर आणि यांच्याबरोबर औंध – बोपोडी- प्रभात रोड – भांडारकर रोड – मॉडेल कॉलनी इत्यादी भागातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर बैठका घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. अशा बैठका महिन्यातून दोनदा नागरिक आणि अधिकाऱ्यांसमवेत घेण्याचा संकल्प आमदार शिरोळे यांनी जाहीर केला.

लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांच्या समस्या फक्त जाणून न घेता त्या प्रत्यक्षात सोडविणे हे माझे कर्तव्य आहे आणि यासाठी मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत व करत आहे. आपल्यावर विश्वास दाखविलेल्या नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात येणारे प्रश्न व विविध समस्या याकडे माझे व माझ्या टीमचे नेहमीच लक्ष असते. याच कार्यतत्परतेने यापुढेही विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी व माझी टीम कटिबध्द आहे, असे आमदार शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

औंध बैठकीस प्रकाश ढोरे, अर्चना ताई मुसळे, मधुकर मुसळे, बाळासाहेब रानवडे, दत्तात्रय गायकवाड, सचिन वाडेकर,
आनंद छाजेड, अभिजित गायकवाड, वसंत तात्या जुनवणे, गणेश नाईकरे, सचिन मानवतकर, सुप्रीम चोंधे,
गणेश कलापुरे, अनिल भिसे, सौरभ कुंडलिक, अतुल गायकवाड, संकेत कांबळे, रोहित भिसे, राजू पिल्ले,
तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर खलाटे, तसेच नागरिक उपस्थित होते.

घोले रोड दत्ताभाऊ खाडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, निलीमाताई खाडे, ज्योत्स्नाताई एकबोटे,
राजश्री ताई काळे, आदित्य माळवे, मुकारी आण्णा अलगुडे, योगेश बाचल, हरीश निकम, नंदकुमार मांडोरा,
जितेंद्र मांडोरा, ओंकार केदारी, रविराज यादव, अपर्णाताई गोसावी, बिरु खोमणे, अपूर्व खाडे, किरण ओरसे,
रामभाऊ म्हेत्रे, शुभम हिंगाडे, मंगेश माने, रमेश भंडारी, सचिन मानवतकर, तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे
वार्ड ऑफिसर रवी खंदारे साहेब, तसेच नागरिक उपस्थित होते.

Web Title :- MLA Siddharth Shirole | Meetings will be held twice a month at the field office; Resolution of MLA Shirole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | काही निर्णय अजून व्हायचे आहेत, न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांचे सूचक विधान

Bhagat Singh Koshyari | ‘मी जे काही निर्णय घेतले ते…’, न्यायालयाने झापल्यानंतर कोश्यारींची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)