MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र’; आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : MLA Sunil Tingre | वडगाव शेरी मतदारसंघातील (Vadgaon Sheri Constituency) येरवडा येथे नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्था Industrial Training Institute (आयटीआय – ITI) स्थापन करण्यास राज्य शासनाने (State Government) मंजुरी दिली आहे. या आयटीआय प्रशिक्षण केंद्रात एकूण 9 विविध व्यावसायिक कोर्सेचे प्रशिक्षण मिळणार असून वर्षभरात जवळपास पावने चारशे विद्यार्थांना त्याचा लाभ मिळणार आहे. (MLA Sunil Tingre)

वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी येरवडा येथे आयटीआय प्रशिक्षण केंद्र सुरू
करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
त्यानुसार तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात येरवडा येथे आयटीआय सुरू
करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाकडून प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार बुधवारी येथील आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठीचा अभ्यासक्रम, पदनिर्मिती व त्यासाठीच्या आवश्य्यक खर्चास मंजुरी देण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने काढले आहेत.

हे कोर्स शिकविणार
येरवडा येथील आयटीआय प्रशिक्षण केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोगॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,
टुल अ‍ॅण्ड डायमेकर, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मे़कॅनिक ऑटो पेटिंग, फिटर,
इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या पदांचा समावेश आहे. त्यात एकूण 376 विद्यार्थांना प्रशिक्षण मिळणार असून
त्यासाठी 40 विविध पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकीत नागरि प्रश्नांच्या सोडविणुकीबरोबरच रोजगार निर्मितीचे आश्वासन मी दिले होते.
त्यानुसार येरवडा येथे आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला. हे संस्थेतून प्रशिक्षण घेऊन चाकण,
राजंगणगाव परिसरात रोजगाराच्या संधी निश्चितपणे उपलब्ध होतील असा विश्वास आहे.
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

Web Title : MLA Sunil Tingre | ITI Training Center to be set up at Yerawada’; Success in the pursuit of MLA Sunil Tingre

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police – SP PR Patil | पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार पोलिसांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात तब्बल 116 तक्रारींचे निवारण

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल