MNS Chief Raj Thackeray | ‘…ती रिएक्शन आहे’, टोलनाका तोडफोड प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचे वाहन रोखल्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड (Toll Booth Vandalism) केली. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. भाजपने (BJP) या प्रकारावरुन अमित ठाकरेंवर टीका करत ही दादागिरी राज्यात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला होत. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन करत राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, अमित ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. एका टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. अमितच्या कारला फास्टटॅग (FASTag) असूनही त्याला तिथे थांबवण्यात आले. सर्वकाही असल्याचे त्याने सांगितले. त्यावर तिथले कर्मचारी कुणाशी तरी वॉकी-टॉकीवरुन बोलत होते. समोरचा माणूस उद्धटपणे बोलत होता. त्यातून आलेली ती रिएक्शन आहे. तो राज्यभरात टोल फोडत चाललाय असं नाही. मात्र, त्यापेक्षा भाजपने महाराष्ट्र टोलमुक्त (Maharashtra Toll Free) करु असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज ठाकरेंनी केली.

जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का?

राज ठाकरे पुढे म्हणाले, प्रत्येकवेळी टोल म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात. हा कोणाचा लाडका आहे? ही टोलची प्रकरणे तरी काय आहे? समृद्धी महामार्गावर रस्ता बनवताना सदोष रस्ता बनवला. त्यामुळे 400 जणांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार आहे का? रस्ता सुरु करण्यापूर्वी टोल बसवताय. लोकांच्या जगण्या मारण्याची काळजी नाही. लोक गाडी चालवतायेत मरुदे असं धोरण आहे का असंही राज ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.

केंद्रात मराठी मंत्री तरी देखील…

राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. अनेक तास ताटकळत राहावे लागते.
तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजप काय बोलणार का? 17 वर्ष मुंबई-गोवा महामार्ग
(Mumbai-Goa Highway) तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे
आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुर्दैव नाही. 65 टोलनाके मनसेच्या आंदोलनामुळे बंद झाले त्याचे कौतुक करणार नाही. मात्र जे टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देऊन सत्तेत आले त्यांना प्रश्न विचारणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

Dengue Cases on the Rise in Pune: Health Authorities on High Alert