‘फ्रैंकफिन इन्स्टिटयुट ऑफ एअरहोस्टेस ट्रेनिंग सेंटर’चे अभ्यासकेंद्र तात्काळ बंद करावीत : ‘मनसे’ची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या तक्रारीनंतर तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत सन २०१० पासून चालू असलेल्या फ्रैंकफिन इन्स्टिटयुट ऑफ एअरहोस्टेस ट्रेनिंग या बोगस संस्थेची तपासणी केली असता आजरोजी पर्यंत बेकायदेशीरपणे इन्स्टिट्युट कार्यरत होती महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना बोगस डिप्लोमा सर्टिफिकेट देऊन फसवणूक केली आहे व लाखो रूपयांचे शुल्क अकारून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी या इन्स्टिटयूटने खेळ केला आहे. या विद्यार्थ्यांना एअरहोस्टसचे स्वप्न भंग केले आहे, तंत्रशिक्षण विभागाने यांच्या आदेशानुसार विविध शहरात सुरू असलेली अभ्यासकेंद्र ताबडतोब बंद करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने चे पुणे अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी केली आहे.

तसेच या निर्णयामध्ये अ .क्र. ४ नुसार सर्व अभ्यासकेंद्रामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरीता व अन्य प्रयोजनाकरीता घेतलेले शुल्क त्वरीत विद्यार्थ्यांन परत देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. १५ दिवसांच्या आत शुल्क परत न केल्यास फौजदारी गुन्हा करण्याचे आदेश पुणे विभागीय सहसंचालक यांना दिले आहे. या सर्व तक्रारींचा गेली अनेक वर्ष मनविसेने मुंबई मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून शासनाच्या निदर्शनास आणून या संस्थेचा पर्दाफाश केला आहे. ज्या विद्यार्थी व पालकांची फसवणूक झाली आहे त्यांनी फ्रैंकफिन इन्स्टिटयूटकडे शुल्क परत घेण्यासाठी अर्ज व सर्व कागदपत्रांसह करावा त्याची एक प्रत मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, २०४ नारायण पेठ, पुणे संपर्क क्रमांक ९९७०२३९९९९ येथे एक प्रत द्यावी. या सर्व तक्रारींचा पाठपुरावा प्रशांत कनोजिया जिल्हा अध्यक्ष, पुणे सचिन पवार पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, शैलेश विटकर, रूपेश घोलप व रवी बनसोडे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य करतील असे. आवाहन ही यावेळी करण्यात आले.