MNS MLA Raju Patil | ‘नशीबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका’, मनसे आमदार राजू पाटलांचा खा. श्रीकांत शिंदेंना टोला

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण लोकसभा क्षेत्र आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा भाग आणि उच्चशिक्षित मतदार असलेल्या पलावा वसाहतीमधील मालमत्ता कर (Property Tax) कमी करण्यासाठी मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील (MNS MLA Raju Patil) प्रयत्न करत आहेत. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) मात्र या कामाचे श्रेय राजू पाटील यांना मिळू नये यासाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकून हे काम तातडीने मार्गी लागणार नाही याची गनिम पद्धतीने खेळी करत असल्याचे राजू पाटील यांना समजले. यानंतर संतप्त झालेल्या राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून खासदार शिंदे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

 

काय म्हणाले राजू पाटील?

 

शिंदे गटाचा (Shinde Group) एक मोठा लोकप्रतिनिधी ITP Project म्हणून पलावा सिटीला नियमानुसार जी 66 टक्के सुट मिळावी म्हणून ती मिळविण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहे. त्याचे श्रेय मिळू नये म्हणून KDMC आयुक्तांवर दबाव आणत असल्याचे मला काही पालिका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर निदर्शनास आणून दिले आहे. हे जर खरे असेल तर मला ’त्या’ लोकप्रतिनिधीला एवढेच सांगायचे आहे की नशीबाने तुम्हाला हत्ती दिले आहे व तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका. लोकहिताच्या निर्णयांना समर्थन द्या, कदाचित हीच पुण्याई भविष्यात तुम्हाला कामाला येईल, आणि हो…ते श्रेय वगैरे जे काही आहे ना ते तुम्हीच घ्या, आम्हाला त्याची गरज नाही, असे राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

आमदार राजू पाटील यांच्या टीकेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली परिसरातील रखडलेली विकास कामे, खड्डे, रस्ते विषयांवरुन मीच केले, मीच निधी आणला असा छाती बडवून गवगवा करणाऱ्या खासदार शिंदेंवर राजू पाटील तीन वर्षापासून फलक, पत्रके,
ट्विटच्या माध्यमातून लक्ष करत आहेत. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
मानाच्या पदावर विराजमान झाल्यानंतर राजू पाटील विरुद्ध शिंदे यांच्या ट्विट, फलकांचे युद्ध संपुष्टात आले होते.
मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अलिकडे गनिम पद्धतीने राजू पाटील यांच्या विकास कामांमध्ये खोडे
घालण्यास सुरुवात केल्याने राजू पाटील खासदाराच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराज आहेत.
ही नाराजी राजू पाटील यांच्या ट्विटमधून पुन्हा दिसून आली आहे.

 

Web Title :- MNS MLA Raju Patil | mla pramod patil criticizes mp shrikant shinde over property tax
in palava colony matter


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Maharashtra Politics News | जर शिंदे-ठाकरे एकत्र येण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेतला तर…, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

Birsa Munda Krushi Kranti Yojana Pune Maharashtra | बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा 50 शेतकऱ्यांना लाभ