मनसे-Amazon वाद चिघळला ! राज ठाकरेंना नोटीस, 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि ॲमेझॉन (Amazon) यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. कारण आता हा वाद कोर्टात गेला असून या प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला ॲमेझॉनने कायदेशीर नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश दिले आहेत. ॲमेझॉनच्या ॲपवर इतर भाषाप्रमाणे मराठीला सामावून घेण्याचा मनसेचा आग्रह आहे. त्याला ॲमेझॉन सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा वाद सुरू झाला आहे. त्यात आता या नोटीसमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील ॲमेझॉन कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जाव केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढल्या 5 जानेवारीला त्याची इच्छा असल्यास उपस्थित राहू शकतात, असे दिंडोशी न्यायालयाने बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे. दरम्यान ॲमेझॉनला सनदशीर मार्गाने आंदोलन केल्याचे समजत नसेल तर आता मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चौहान यांनी दिली आहे.

काय आहे वाद?
मनसेच्या वतीने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ड या दोन कंपन्यांना आपापल्या ॲपमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव केला नाही तर त्यांचा मनसे स्टाइल समाचार घेण्यात येईल, असा इशारा मनसेने आधीच दिला होता. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले आहे. तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकवू अशा देण्यात आला होता.