Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल; आतापर्यंत डॉ. हर्षवर्धन यांच्यासह 9 मंत्र्यांनी का दिला राजीनामा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi government Cabinet Reshuffle । मोदी सरकारचा (Modi government) आज रात्री कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (Cabinet Reshuffle) झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 9 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मोदी सरकारमधील बड्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या कारणांनी राजीनामा घेतला आहे. त्यात आरोग्यमंत्री असणारे डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे.

मोदी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री असलेले थावर चंद गहलोत (Thawar Chand Gehlot) यांना मंत्रिमंडळातून बाजूला करून कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, त्याव्यतिरिक्त थावर चंद गहलोत यांच्याकडे राज्यसभा सभागृहाचं सदस्यपद आणि भाजपाच्या संसदीय मंडळाचं देखील पद होते.

 

1. डॉ. हर्षवर्धन :

मोदी सरकारमधील असलेले केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
त्याचा फटका डॉ. हर्ष वर्धन यांना बसला आहे. तसेच, हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कारभार देखील होता. आता यांच्या राजिनाम्यामुळे दोन मंत्रालय रिक्त झाले आहे.

2. रमेश पोखरियाल निशंक :
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असेलेले आणि हरिद्वारचे खासदार असलेले रमेश पोखरियाल निशंक यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. ते मानव संसाधन विकास मंत्री होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 1 महिना उपचारासाठी रुग्णालयात होते. आरोग्याच्या कारणामुळे त्यांचा राजीनामा घेतला आहे.

3. प्रताप सारंगी :
ओडिशामधील बालासोरचे खासदार प्रताप सारंगी यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते सूक्ष्म, लघु व मध्यम यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

4. देबोश्री चौधरी :

पश्चिम बंगाल रायगंडचे खासदार देबोश्री चौधरी यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालयाचा कारभार होता.
त्यांना पश्चिम बंगालमध्ये भाजपासाठी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

5. बाबुल सुप्रियो :
पश्चिम बंगाल आसनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांचा देखील राजीनामा घेतला आहे. ते पर्यावरण राज्यमंत्री होते. बाबुल सुप्रिया पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रिया उभे होते. मात्र पन्नास हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

6. सदानंद गौडा :
कर्नाटक बंगळुरू येथील सदानंद गौडा यांचाही राजीनामा घेतला आहे. ते केंद्रीय रासायनिक आणि खते उत्पादन मंत्री होते.
कोव्हिडच्या काळामध्ये औषधांच्या उत्पादनावरून मोदी सरकारवर टीका झाली होती. त्याचा फटका गौडा यांना बसला आहे.

7. संतोष गंगवार :
उत्तर प्रदेशच्या बरेलीचे खासदार संतोष गंगवार यांचा देखील राजीनामा घेण्यात आला आहे.
ते कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार मंत्री होते.
कोरोना काळात संतोष गंगवार यांनी लिहिलेले पत्र पूर्णतः प्रसारित झालं आहे.
त्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
त्यांच्या जागी लखीमपूर येथील खासदार अजय मिश्रा यांना मंत्रिपद दिलं जाते.

8. रतनलाल कटारिया :
हरियाणातील अंबालाचे खासदार रतन लाल कटारिया यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाचा कारभार होता. त्यांच्या जागी खासदार सुनीता दुग्गल यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

9. संजय धोत्रे :
महाराष्ट्र राज्यातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे शिक्षण विभागासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संजय धोत्रे यांच्या कामगिरीवर नाराज आहेत.
यावरून त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
त्यांना मंत्रिमंडळातून हटवून पक्ष संघटनेचे काम दिले जाऊ शकते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title :  Modi Cabinet Expansion | narendra modi cabinet reshuffle
9 ministers removed so far what are reasons behind resignation

 

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास