Modi Govenment | मोदी सरकारची दिवाळी भेट, सर्वसामान्यांसाठी स्वस्तात ‘भारत आटा’; जाणून घ्या किंमत आणि इतर गोष्टी…

नवी दिल्ली : Modi Govenment | अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत धान्य योजनेला मुदत वाढ देऊन देशातील तब्बल ८० कोटी गरीबांना मोदी सरकारने नुकताच दिलासा दिला आहे. आता आणखी एक दिवाळी भेट मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिली आहे. केंद्र सरकारने (Central Govt) भारत आटा (Bharat Atta) या नावाने एक ब्रँड देशभरात लॉन्च केला आहे. या गव्हाच्या पिठाची २७.५० रुपये किलो दराने विक्री सुरू केली आहे. (Modi Govenment)

नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशभरातील ८०० मोबाईल व्हॅन आणि २,००० हून अधिक दुकानांमधून भारत आटाची विक्री केली जाणार आहे.

सध्याच्या ३६-७० रुपये प्रति किलोच्या बाजारभावापेक्षा गुणवत्तेवर आणि स्थानानुसार अनुदानित दर कमी आहे. फेब्रुवारीमध्ये, सरकारने किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत काही दुकानांमध्ये या सहकारी संस्थांमार्फत १८,००० टन भारत आटाची २९.५० रुपये प्रति किलो दराने प्रायोगिक विक्री केली.

केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी भारत आटाच्या १०० मोबाईल व्हॅनला
हिरवा कंदील दाखवला. यावेळी पियुष गोयल म्हणाले, आम्ही पिठावर अनेक चाचण्या घेतल्या आणि त्यात यश
आल्याने आम्ही ही सेवा लोकांपर्यंत पोहोचवली आहे. २७.५० रुपये प्रति किलो दराने देशात हे पिठ सर्वत्र उपलब्ध आहे. (Modi Govenment)

पियुष गोयल म्हणाले, चाचणीच्या वेळी गव्हाच्या पिठाची विक्री कमी होती. कारण त्याची काही स्टोअरमधूनच
किरकोळ विक्री होत होती. आता उत्पादनाची विक्री चांगली होईल. कारण देशभरातील तीन एजन्सीच्या ८०० मोबाईल
व्हॅन आणि २,००० दुकानांमधून उत्पादनाची विक्री केली जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून करुन दहशत पसरवणाऱ्या बाबु मिरेकर व त्याच्या 8 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 80 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Pune Crime News | विनयभंगाची तक्रार दिल्याच्या रागातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, हडपसरमधील घटना; दोघींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल