Modi Government | मोदी सरकारकडे सरकारी संपत्ती विक्री करण्याची मोठी यादी तयार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक आर्थिक अडचणींचा सामना देशाला करावा लागत असल्याने मोदी सरकारने (Modi Government) निर्गुंतवणुकीवर भर देत आहे. सरकारी मालमत्ता विकून त्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन (एनएमपी) योजनेची सुरुवात करतील. पुढील ४ वर्षांत मोदी सरकार कोणकोणत्या सरकारी मालमत्ता विकणार आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये असेल अशी माहिती नीती आयोगान (niti aayog) दिली आहे. येत्या ४ वर्षांत अनेक कंपन्या, पॉवरग्रीड, द्रुतगती मार्ग विकण्याच्या तयारीत सरकार असून याद्वारेगुंतवणूकदारांना स्पष्ट संदेश जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून जवळपास ६ लाख कोटी रुपये मिळतील इतक्या मालमत्तांची यादी तयार केली आहे. अर्थसंकल्प मांडतानाच अर्थमंत्र्यांनी एनएमपीचा उल्लेख केला होता. तर काही दिवसांपूर्वीच निर्गुंतवणुकीच्या योजनेची गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी माहिती दिली होती.

मुलभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी, विकास प्रकल्पांसाठी निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वापरली जाणार आहे. अर्थसकंल्पावेळी अर्थमंत्र्यांनी भाषण केले होते.
त्यावेळी केलेल्या भाषणात मुलभूत सोयी सुविधा आणि निर्गुंतवणुकीवर सर्वाधिक भर दिला होता.
याकडेही पांडेय यांनी लक्ष वेधलं.
यासंदर्भात अर्थमंत्री सीतारामन एनएमपी योजनेची सविस्तर माहिती देतील.
यावेळी त्यांच्यासोबत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि अन्य सचिव उपस्थित असतील.

Web Title : Modi Government | nirmala sitaraman will release list government properties be sold four years today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Lic Jeevan Amar Policy | जर तुम्ही सुद्धा करत असाल स्मोकिंग, तर भरवा लागेल जास्त प्रीमियम; जाणून घ्या

TATA Motors Electric Car | सिंगल चार्जवर 300 km धावते ‘ही’ इलेक्ट्रिक कार, ‘या’ दिवशी होईल किमतीचा खुलासा

Parambir Singh | सचिन वाझेच्या ‘कोड’चा हॉटेल मालकाने केला उलगडा; ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंग