Modi Government Schemes | मोदी सरकारची ‘ही’ योजना झाली ‘सुपरहिट’ ! तुम्ही सुद्धा 250 रुपयात उघडू शकता अकाऊंट, मॅच्युरिटीवर मिळतील 15 लाख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीची योजना (Investment Planning) बनवत असाल तर मोदी सरकारची सुकन्या समृद्धी योजना (SSY) खुप फायदेशीर ठरू शकते (Modi Government Schemes) . मोदी सरकारद्वारे चालवण्यात येत असलेली ही Sukanya Samriddhi योजना लोकांना खुप पसंत पडली (Modi Government Schemes) आहे. नॅशनल सेव्हिंग्ज इन्स्टीट्यूटनुसार, सुकन्या समृद्धी स्कीममध्ये लोकांनी यावर्षी मेपर्यंत सुमारे 1.05 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. Modi Government Schemes | best investment option is scheme sukanya samriddhi yojana you can open account 250 rs earn 15 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मागच्या वर्षी मेअखेर ही रक्कम 75,522 कोटी होती. याचा अर्थ मागील केवळ एक वर्षात या योजनेत गुंतवणुकीची रक्कम सुमारे 40% वाढली आहे.
शानदार व्याज आणि टॅक्स सूटमुळे लोक आपल्या मुलीसाठी यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

मुलीच्या नावाने उघडा खाते

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे.
तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.

PNB मध्ये तुम्ही केवळ 250 रुपयांच्या गुंतवणुकीसह तुमच्या मुलीच्या विवाहापासून तिच्या शिक्षणापर्यंत मोठी रक्कम जमा करू शकता.

या योजनेशी संबंधीत विशेष गोष्टी

कमाल दिड लाख गुंतवू शकता

जर तुम्हाला PNB मध्ये सुकन्या समृद्धी अकाऊंट उघडायचे असेल तर यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. तर कमाल तुम्ही 1,50,000 रुपयांपर्यंत जमा करू शकता.
हे अकाऊंट मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत सुरू ठेवता येऊ शकता.
तुम्ही मॅच्युरिटी अमाऊंट मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर काढू शकता.

वय 10 पेक्षा कमी असावे

PNB मध्ये एका कुटुंबातून कमाल दोन मुलींसाठी अकाऊंट उघडता येऊ शकते.
या योजनेत आई-वडील किंवा गार्डियन एका मुलीच्या नावावर पीएनबीमध्ये केवळ एक अकाऊंट काढू शकतात. मुलीचे वय 10वर्षापेक्षा कमी असावे.

मॅच्युरिटीवर मिळतील 15 लाखपेक्षा जास्त

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील.
21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल.
सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

Web Title : Modi Government Schemes | best investment option is scheme sukanya samriddhi yojana you can open account 250 rs earn 15 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bad Habits | सकाळी उठताच पित असाल चहा तर व्हा सावधान, ‘या’ 7 चूका तुम्हाला आजारी पाडू शकतात, जाणून घ्या