Modi Government Schemes | 8वी पासपासून 12वी मधून शिक्षण सोडलेल्यांसाठी उपयोगी आहेत मोदी सरकारच्या ‘या’ योजना, राहणार नाही बेरोजगार; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government Schemes | मोदी सरकारच्या काही अशा योजना (Modi Government Schemes) आहेत ज्या 8वी पासपासून 12वी इयत्तेतून शिक्षण सोडलेल्यांसाठी खुप उपयोगी आहेत. या योजनांची सविस्तर माहिती आणि पात्रता, अटी, फायदे जाणून घेवूयात…

1. प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम (PM Rojgar Shrujan Karyakram)

पात्रता

भारतीय नागरिक असावा.

18 वर्षावरील कुणीही व्यक्ती.

उत्पादन क्षेत्रात 10 लाख रुपये आणि व्यापार/सेवा क्षेत्रात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या योजनांमध्ये काम करण्याच्या हेतुसाठी किमान 8 वी पास.

लाभ

नवीन उद्योगांसाठी आर्थिक मदत करण्याच्या हेतुसाठी योजना.

2. दीन दयाळ उपाध्याय- ग्रामीण कौशल योजना (Deen Dayal Upadhyay- Rural Skill Scheme)

पात्रता 

भारतीय नागरिक असावा. 15 ते 35 वर्ष वय. महिला आणि इतर कमजोर वर्ग, जसे, अपंग व्यक्तींसाठी, कमाल वय 45 वर्ष.

लाभ 

दीन दयाल उपाध्याय- ग्रामीण कौशल्य योजनेचा (DDU-GKY) उद्देश गरीब ग्रामीण तरूणांना कौशल्य प्रदान करणे, त्यांना नियमित मासिक मजूरी किंवा किमान मजूरीच्या वरील नोकरी देणे.

3. दीन दयाळ उपाध्याय अंत्योदय योजना (Deen Dayal Upadhyaya Antyodaya Yojana)

पात्रता 

कौशल्यसंबंधी प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी कुणी भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.

लाभ

गरीबांना आर्थिक सदृढता प्रदान करण्यासाठी कौशल्या आणि स्वयंरोजगार वाढवणे.

4. पीएम स्वनिधी (PM Svanidhi)

पात्रता 

भारतीय नागरिक असावा. फेरीवाले, ज्यांच्याकडे शहरी स्थानिक संस्थांकडून जारी केलेले फेरीवाला प्रमाणपत्र, ओळखपत्र असावे. फेरीवाले, ज्यांची सर्वेक्षणात नोंद आहे, परंतु त्यांना वेंडिंग प्रमाणपत्र/ ओळखपत्र जारी केले नाही, ते सुद्धा लाभ घेऊ शकतात.

 

लाभ

10,000 रुपयांपर्यंत कर्जसुविधा.

नियमित परतफेडीला प्रोत्साहन.

डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन.

5. प्रधानमंत्री कौशल विकास योजना ( Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana )

पात्रता

भारतीय नागरिक असावा.

12वी इयत्ता सोडणारे किंवा 10वी पास विद्यार्थी कौशल विकसित करण्यासाठी पीएमकेवीवायमध्ये नाव नोंदवू शकतात.

भारतीय राष्ट्रीयत्व असावे. वय 18-45 दरम्यान असावे.

लाभ

तरूणांसाठी उपलब्ध कौशल्य विकसित करणे.

कौशल प्रशिक्षणासाठी तरूणांना मदत देणे.

खासगी क्षेत्राच्या जास्तीत जास्त भागीदारीसाठी स्थायी कौशल्य केंद्रांना प्रोत्साहन.

6. मनरेगा (MANREGA)

पात्रता

 भारतीय नागरिक असावा. 18 वर्षापेक्षा जास्त वय, ग्रामीण भागात राहणारा कामासाठी अर्ज करू शकतो.

लाभ

 प्रति वर्ष प्रति कुटुंब 100 दिवसासाठी काम. अर्जदाराला 15 दिवसांच्या आत काम. नियम आणि धोरणानुसार वेतन दरात सुधारणा केली आहे.

 

Web Title : Modi Government Schemes | schemes of modi government are of great work for the people leaving class 8th to 12th they will not remain unemployed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Changes in Auto Insurance | ऑटो इन्श्युरन्समध्ये मोठा बदल ! नवीन गाडी खरेदी केल्यास ‘बंपर टू बंपर’ विमा (पूर्ण इन्श्यूरन्स) झाला अनिवार्य

Pune Crime | तोतया वकिल दाम्पत्याने बनावट रजिस्ट्रेशन करुन केली व्यावसायिकाची 13 लाखांची फसवणूक

Nagpur Crime | दोस्त दोस्त ना रहा ! रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राचा मित्रानेच काढला काटा