सणासुदीपुर्वीच मोदी सरकारकडून मोठं ‘गिफ्ट’, आता स्वस्त LED आणि LCD टीव्ही खरेदी करणं शक्य, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सणासुदीच्या निमित्ताने मोदी सरकारद्वारे सर्वसामान्यांना मोठी भेट दिली जाणार आहे. सर्वसामान्य माणूस आता LCD आणि LED स्वस्तात खरेदी करू शकणार आहेत. सरकारने टीव्हीवरील पाच टक्के सीमाशुल्क काढून टाकले आहे.

सरकारच्या या पावलामुळे टीव्ही पॅनेलच्या किंमतीत जवळपास 3 टक्क्यांची कपात होईल. ओपन सेल पॅनेल हा टेलिव्हिजनच्या निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे एका टीव्ही सेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त किंमतीचे आहे.

अर्थ मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, एलसीडी आणि एलईडीच्या निर्माणासाठी लागणारे ओपन सेल टीव्ही पॅनेलवर कोणतेही शुल्क लावणार नाही. याचबरोबर सरकारने चिप ऑन फिल्म, प्रिंटेड सर्किट बोर्ड एसेंबली (पीसीबीए) आणि सेल यांच्यावर असलेला असलेल्या इम्पोर्ट सीमा शुल्क सुद्धा काढून टाकला आहे. हे सर्व साहित्य ओपन सेल टीव्ही पॅनल बनवण्यासाठी उपयोगात येते.

सरकारने 30 जून 2017 ला पॅनलच्या इम्पोर्टवर 5 % सीमा शुल्क लावला होता. अनेक टीव्ही निर्मिती कंपन्यांसोबत कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅंड अ‍ॅप्लाइंसेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने या निर्णयाचा विरोध केला होता आणि हे बंद करण्याची मागणी केली होती.

वेल्डेड स्टील पाइप, ट्यूबवर अ‍ॅंटी डंपिंग ड्यूटी लागली, स्वस्त होणार पाईप
सरकारने स्टेनलेस स्टील पाइप, ट्यूबवर अ‍ॅंटी डंपिंग ड्यूटी लावली आहे. चीन आणि व्हिएतनाम वरून भारतात डंपिंग होत होती. यावर 11 ते 30 % पर्यंत अ‍ॅंटी डंपिंग ड्यूटी लागली आहे. ही अ‍ॅंटी डंपिंग ड्यूटी 5 वर्षांसाठी लावण्यात आली आहे. चीन आणि व्हिएतनामवरून येणाऱ्या उत्पादनांवर ही ड्यूटी लागणार आहे.

Visit – policenama.com 

 

You might also like