PM Shadi Shagun Yojna | खुशखबर ! मोदी सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकारने मुलींसाठी अनेक योजना चालवल्या आहेत. या योजनांचा उद्देश मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा (PM Shadi Shagun Yojna) सुद्धा समावेश आहे. देशात अल्पसंख्यांक समाजात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. अल्पसंख्यांक समाजामध्ये विशेषता मुस्लिम समाजात मुलींमध्ये उच्च शिक्षणाची (Higher Education) स्थिती खुपच वाईट आहे. अशावेळी PM Shadi Shagun Yojna देशातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सरकार देते 51,000 रुपये (modi government schemes)

पीएम  शादी शगुन योजनेत विवाहाच्या पूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण करणार्‍या अल्पसंख्यांक समाजाच्या तरूणींना केंद्र सरकार (central government) 51,000 रुपये देते.
या योजनेचा हेतू मुस्लिम मुली (Muslim girls) आणि त्यांच्या पालकांना या गोष्टीसाठी प्रोत्साहित करायचे आहे.
की, मुलींना विद्यापीठ किंवा कॉलेज स्तरावरील शिक्षण पूर्ण करता येऊ शकते.

या लोकांना मिळेल योजनेचा लाभ

सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या शादी शगुन योजनेचा (पीएमएसएसवाय) लाभ त्याच मुस्लिम मुलींना मिळू शकतो, ज्यांनी शालेय स्तरावर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली आहे.
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मुस्लिम, ईसाई, शिख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील मुलींना दिली जाते.

National Pension Scheme | पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर ! आता NPS मधून पूर्ण पैसे काढू शकता, जाणून घ्या

असा करा योजनेसाठी अर्ज

शादी शगुन योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्ही केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाकडून प्राप्त करू शकता.
जर तुम्हाला एसएसवाय योजनेबाबत जास्त माहिती घ्यायची असेल.
तर त्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा :  https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation

 

Web Title : modi government to give rupees 51000 under pm shadi shagun yojna for muslim girls check details

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मोदी सरकार देत आहे 4000 रूपये मिळवण्याची संधी, पहा डिटेल