Mohan Joshi Congress On BJP Sankalp Patra | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’ – मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mohan Joshi Congress On BJP Sankalp Patra | पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Lok Sabha) भारतीय जनता पक्षाने प्रकाशित केलेले संकल्पपत्र हे भाजप परंपरेतील फसवणूक पत्रच आहे असे स्पष्ट दिसून येते. कारण गेली १० वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे. तसेच पुण्यात भाजपचे महानगरपालिकेत १०० नगरसेवक, ६ आमदार आणि १ खासदार असूनही पुण्याचा विकास ठप्प झाला, स्मार्ट सिटी योजना फसली, मेट्रो प्रकल्प किलोमीटरऐवजी इंच-इंचाने पुढे सरकत आहे, नदी सुधार प्रकल्पात प्रगती शून्य आहे, ट्रॅफिक समस्या अधिक जटिल झाली आहे. हे व असे अनेक प्रश्न सत्ता असूनही भाजपने सोडवले नाही आणि या नव्या संकल्पपत्रात मात्र ‘काय करणार’ याची जंत्री दिली आहे. पुणेकरांचा त्यामुळेच भाजपाच्या या संकल्पपत्रावर विश्वास बसणार नाही हे निश्चित.(Mohan Joshi Congress On BJP Sankalp Patra)

काँग्रेस पक्षाने पुण्याचा सर्वांगीण चौफेर विकास केला, नव्या चांगल्या रोजगारांच्या संधी निर्माण केल्या.
असे काहीही भाजपने संधी असूनही केले नाही. कारण पुण्याचा विकास करण्याची क्षमता, जिद्द, दूरदृष्टी आणि धमक
त्यांच्यात नाही. त्यामुळेच भाजपचे आताचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’ आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane On Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा; भाजप नेते हेमंत रासनेंची नागरिकांना ऑफर

Beed Crime News | महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण?