Mohandas Sukhtankar Passes Away | ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन : Mohandas Sukhtankar Passes Away | सिनेसृष्टीतून आज पुन्हा एकदा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले. वयाच्या 93 वर्षी मुंबईतील राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. (Mohandas Sukhtankar Passes Away)

मोहनदास यांच्या नाट्य प्रवासात गोवा हिंदू असोसिएशनचे महत्त्वाचे स्थान आहे. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातूनच दीर्घकाळ नाट्यसेवा केली होती. त्यांनी सुरुवातीला कलाकार म्हणून नाटकांमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते कार्यकर्ता म्हणून रंगभूमीवर वावरले. मोहनदास यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे जगातील नामांकित डॉक्टर होते, तेदेखील समाजकार्य म्हणून काम करत होते. सुखटणकर यांचे बालपण गोव्यातच गेले. (Mohandas Sukhtankar Passes Away)

शाळेत दुसरीत असताना त्यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना हे काम जमत नसल्याचे वाटत होते. मात्र, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितल्यानंतर ते रंगभूमीवर प्रेम करायला लागले. ‘बंडखोर बंडू’ असे त्यांच्या पहिल्या नाटकाचे नाव होते.

सुखटणकर यांनी आयुष्यभर रंगभूमी हेच आपले दैवत मानले आणि नोकरी सांभाळता सांभाळता कलावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजवर काम केले होते.
आतापर्यंत त्यांनी 40 ते 45 नाटकांत काम केले होते.
‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ यांसारख्या अनेक नाटकांत
त्यांनी काम केले. त्याबरोबरच ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’,
‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ चित्रपटांतही त्यांनी काम केले होते, तर ‘रायगडला जेव्हा जाग येते’
हे त्यांचे रंगभूमीवर प्रचंड गाजलेले नाटक होते. त्याचबरोबर त्यांनी ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या
अशा हिंदी मालिकेतदेखील काम केले. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले.
टीव्ही विश्वावर ते जास्त रमले नसल्याने त्यांनी परत रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती.

Web Title :- Mohandas Sukhtankar Passes Away | veteran marathi dramatist actor mohandas sukhtankar passed away at age of 93

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

HC On Minor Girl Rape Case | ‘अल्पवयीन मुलीच्या संमतीने शरीरसंबंध हा बलात्कारच’ – उच्च न्यायालय

Gold Silver Prices | सोने, चांदीच्या दरांत मोठी घट

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग