EPS बाबत सरकारचा मोठा निर्णय ! 65 लाख पेन्शनधारकांवर काय होणार परिणाम ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि इन्फेशन इंडेक्ससोबत (महागाई निर्देशांक) जोडण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विमा नियामक (IRDAI) अशाप्रकाचे एक उत्पादन लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे पेन्शनधारकांना मोठा फायदा हेईल अशे बोलले जात होते, मात्र, केंद्राने असा कोणताही निर्णय घेतला नाही.

सरकारकडून कर्मचारी पेन्शन योजना 1995 संबंधित जोडलेल्या पेन्शनधारकांच्या अनेक मागण्या होत्या. यासाठी सरकारकडून समिती गठीत करण्यात आली होती. कामगार मंत्रालयाच्या समितीने याबाबत कोणतीही सूचना केलेली नसल्याने ईपीएस आणि इन्फ्लेशन इंडेक्स सोबत जोडली जाणार नाही.

1 हजार ऐवजी 3 हजार पेन्शन द्यावी

EPFO बोर्डाचे सदस्य विरजेश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीने ईपीएस आणि इन्फ्लेशन इंडेक्ससोबत जोडण्याबाबत कोणतीही सूचना केलेली नाही. सध्या पेन्शनधारकांना 1 हजार रुपये मूलभूत पेन्शन दिली जाते. मात्र, यामध्ये वाढ करून 3 हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी पेन्शनधारकांनी केली आहे. पेन्शन धारकांनी केलेली ही मागणीबाबत कोशियारी समितीने काही सूचना सरकारला पाठवल्या आहेत. परंतु सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

तर 65 पेन्शनधारकांना फायदा

पेन्शनधारकांचा संबंध महागाई निर्देशांकाशी जोडला पाहिजे. यामुळे पेन्शनधारकांना याचा चांगला दिलासा मिळू शकतो. परंतु तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर असा कोणताही प्रस्ताव लागू केला तर याचा थेट फायदा ईपीएस -95 च्या 65 लाख पेन्शनधारकांना मिळू शकतो.

पेन्शनधारकांना अधिक पैसे मिळतील

ईपीएस योजनेला महागाई निर्देशांक किंवा सरकारी सिक्युरिटीजसोबत जोडल जाऊ शकतं, असा अंदाज IRDAI ने व्यक्त केला आहे. या नवीन योजनेचा फायदा महागाई वाढल्यानंतर पेन्शनधारकांना अधिक पैसे मिळण्यासाठी होणार आहे. निवृत्ती वेदनधारकांना दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळेल अशी योजना असली पाहिजे. यासाठी फ्लोटिंग रेट अ‍ॅन्युइटीसारखे उत्पादन आणले जाऊ शकते. यामध्ये महागाई निर्देशांशी जोडले जाऊ शकते, असे IRDAI चे अध्यक्ष सुभाषचंद्र खुटिया यांनी सांगितले.