Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; युनायटेड इलेव्हन संघाची विजयी कामगिरी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात युनायटेड इलेव्हन संघाने बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबचा ४ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली. (Monsoon League Cricket Tournament 2023)

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना युनायटेड इलेव्हन संघाने २० षटकामध्ये ५ गडी गमावून १८३ धावांचे आव्हान उभे केले. आयुष देव याने २९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी केली. याचबरोबर राहूल संग्राम (३८ धावा), भावेश पाटील (३७ धावा) आणि हुसेन तांबोळी (३० धावा) यांनी धावांचे योगदान देत मोठी धावसंख्या उभी करण्यास मदत केली. निखील जोशी याने ३७ धावात ३ गडी बाद केले.

धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करण्यात बिझनेस प्रोफेशनल्स् संघाला अपयश आले.
दुसर्‍या षटकामध्ये सलामी फलंदाज गमवल्यानंतर पाचव्या षटकानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला.
त्यानंतर पुन्हा खेळ सुरू करण्यापुर्वी व्हिडीआर मेथडनुसार संघाला १३ षटकात १११ धावांचे सुधारीत लक्ष्य
देण्यात आले. पण आवश्यक धावगती राखण्यात अपयश आल्याने संघाचा डाव १०७ धावांवर मर्यादित राहीला.
अभिषेक खांबेटे याने ६० धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. (Monsoon League Cricket Tournament 2023)

पावसामुळे स्पर्धेत कोणताही सामना होऊ शकला नाही.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
युनायटेड इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद १८३ धावा (आयुष देव नाबाद ४१ (२९, ४ चौकार), राहूल संग्राम ३८,
भावेश पाटील ३७, हुसेन तांबोळी ३०, निखील जोशी ३-३७) व्हिडीआर मेथडनुसार वि.वि. बिझनेस प्रोफेशनल्स्ः
१३ षटकात ४ गडी बाद १०७ धावा (अभिषेक खांबेटे ६० (४३, ८ चौकार, १ षटकार), नाना शिंदे २-३२, विजय शिंदे १-१७);
सामनावीरः आयुष देव;

Web Title :  Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament; A winning performance by United XI

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा