Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लब, एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

पुणे : Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Monsoon League Cricket Tournament 2023) बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लब आणि एचआरकॅपिटा सोल्युशन्स् यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अभिषेक खंबाटे याच्या ७७ धावांच्या मदतीमुळे बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबने युनायटेड इलेव्हन संघाचा ५७ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना बिझनेस प्रोफेशनल्स् संघाने १८७ धावांचे आव्हान उभे केले. अभिषेक खंबाटे याने ५२ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह ७७ धावा चोपल्या. शशांक जोशी (३८ धावा) आणि गिरीष कोंडे (३८ धावा) यांनीही फलंदाजीमध्ये योगदान दिले. या धावसंख्येसमोर युनायटेड इलेव्हनचा डाव १३० धावांवर मर्यादित राहीला. गोलंदाजीमध्ये बिझनेस प्रोफेशनल्स् संघाच्या गिरीष ओक आणि हर्षद तिडके यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

सचिन कापडे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ने ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा ११७ धावांनी सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा धावफलकावर लावल्या. निखील शिंदे (३८ धावा), रोहन खटाळे (३८ धावा), अरविंद चौहान (२६ धावा) आणि अक्षय डांगे (२३ धावा) यांनी फलंदाजीची धुरा सांभाळली. या आव्हानासमोर ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा डाव ६१ धावांवर गडगडला. जलदगती गोलंदाज सचिन कापडे याने १७ धावात ३ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अभिमन्यु ढमढेरे आणि रोहीत साळुंके यांनीसुद्धा दुसर्‍या बाजूने सुरेख गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. (Monsoon League Cricket Tournament 2023)

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद १८७ धावा (अभिषेक खंबाटे ७७ (५२, १४ चौकार), शशांक जोशी ३८,
गिरीष कोंडे ३८, रितेश साळी २-३०) वि.वि. युनायटेड इलेव्हनः १७.१ षटकात १० गडी बाद १३० धावा (आयुष देव २७,
प्रतिक घाटे २५, रितेश साळी २०, गिरीष ओक ३-१५, हर्षद तिडके ३-१७); सामनावीरः अभिषेक खंबाटे;

एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ः २० षटकात ९ गडी बाद १७८ धावा (निखील शिंदे ३८, रोहन खटाळे ३८, अरविंद चौहान २६,
अक्षय डांगे २३, सुहास जगदाळे ३-२०, गौरव उपाध्याय २-३७) वि.वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः १२.४ षटकात १० गडी बाद
६१ धावा (आकाश पुरोहीत १७, सचिन कापडे ३-१७, अभिमन्यु ढमढेरे ३-१५, रोहीत साळुंके २-१); सामनावीरः सचिन कापडे;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi-Urjit Patel | पंतप्रधान मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले होते, पैशाच्या ढिगार्‍यावर बसलेला साप, कोणी सांगितला प्रसंग…वाचा