PM Narendra Modi-Urjit Patel | पंतप्रधान मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले होते, पैशाच्या ढिगार्‍यावर बसलेला साप, कोणी सांगितला प्रसंग…वाचा

PM Narendra Modi-Urjit Patel | pm narendra modi compares rbi governor urjit patel with snake on hoard of money subhash chandra garga book marathi news

नवी दिल्ली : PM Narendra Modi-Urjit Patel | कोरोनाचे संकट येण्यापूर्वी बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्या करता केंद्र सरकार आणि रिझर्व बँक यांच्या बैठकीत आरबीआय गव्हर्नर पैशांबाबत काहीच ठोस बोलत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संतापून तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना पैशाच्या ढिगाèयावर बसलेला सापाशी केली होती, असा दावा अर्थखात्याचे माजी सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. हे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. (PM Narendra Modi-Urjit Patel)

सुभाष चंद्र गर्ग यांचे हे पुस्तक वी अल्सो मेक पॉलिसी ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातील गव्हर्नर उर्जित पटेल रिजाईन्स प्रकरणात वरील खळबळजनक उल्लेख आहे. (PM Narendra Modi-Urjit Patel)

मोदी सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये कोरानापूर्वीच्या आर्थिक स्थितीवरुन विसंवाद झाल्याची चर्चा त्यावेळी माध्यमांमध्ये गाजली होती. याच प्रकरणावरून तत्कालीन आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल व विरल आचार्य यांनी मुदतपूर्व राजीनामे दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी हे दावे मोदी सरकारने फेटाळले होते.

सुभाष चंद्र गर्ग यांनी पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार, देशातील आर्थिक स्थिती आणि केंद्र व आरबीआयमधील विसंवाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १४ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकार व आरबीआयच्या उच्चपदस्थांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आर्थिक स्थितीबाबत सविस्तर प्रेझेंटेशन केले. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली व मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा बैठकीला उपस्थित होते. दोन तास चाललेल्या बैठकीनंतर पंतप्रधानांना आर्थिक स्थितीवर कोणताही तोडगा निघताना दिसत नव्हता.

उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही शिफारसी केल्या. काही सल्ले दिले.
यामध्ये केंद्र सरकारने कोणती पावले उचलावीत, हे त्यांनी सांगितले.
मात्र यात आरबीआयद्वारे तेव्हा केल्या जाणाऱ्या उपाययोजनांशिवाय कोणत्याही नव्या कृतीचा समावेश नव्हता.
पण पंतप्रधानांचे म्हणणे होते की आरबीआय परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी काही करत नसून केंद्र व
आरबीआयमधील संबंध सुधारण्यावरही काम होत नाही, असे सुभाष चंद्र गर्ग यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

सुभाष चंद्र गर्ग यांनी पुस्तकात म्हटले आहे की, उर्जित पटेल यांच्या सूचनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले.
मी त्यांना इतक्या रागात कधीच बघितले नव्हते. त्यांनी उर्जित पटेल यांची तुलना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या
सापाशी केली. आरबीआयचा निधी या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वापरत नसल्याबद्दल त्यांनी गव्हर्नरला जबाबदार धरले.

गर्ग यांनी पुस्तकात म्हटले आहे की, यावेळी पंतप्रधानांनी संतापात उर्जित पटेल यांना आरबीआयच्या काही
मुद्द्यांवर सुनावले. तसेच, त्यांना आरबीआयच्या बोर्डाची बैठक घेऊन परिस्थितीवर तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली व अर्थतज्ज्ञांच्या गटाची मदत घेण्यासही पंतप्रधानांनी उर्जित पटेल यांना सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation – Kunbi Caste Certificate | मराठा आरक्षण व मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ व अभ्यासकांची तज्ञ समिती स्थापन; सद्यस्थितीत आंदोलन नव्हे तर कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता, आरक्षण परिषदेत बहुतांश तज्ञांचा सूर

Total
0
Shares
Related Posts