Monsoon Session-2023 | ‘दिल्लीचे ‘आका’ पुण्यात येणार म्हणून अधिवेशनाला सुट्टी दिली का?’, काँग्रेसचा सरकारला तिरकस सवाल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon Session-2023 | सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागचा सरकारचा (Maharashtra Political News) काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूकंप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस सभागृहाचे (Monsoon Session-2023) कामकाज बंद ठेवले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असल्याची शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी व्यक्त केली आहे.

विधानभवन (Vidhan Bhavan) परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये (Advisory Committee Meeting) सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी कामकाज होणार नसून त्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला याचे सविस्तर उत्तर मात्र दिलेले नाही. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन पूर्णवेळ व ठरलेल्या कार्यक्रमानुसार व्हावे अशी काँग्रेसची मागणी असल्याचे पटोले म्हणाले. (Monsoon Session-2023)

राज्यात नैसर्गिक आपत्तीचे (Natural Disaster) मोठे संकट उभे टाकलेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत पण या सरकारला जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून दिल्लीतून येणाऱ्या ‘आका’ची जास्त चिंता आहे, असा टोला नाना पटोले यांनी राज्य सरकारला (State Government) लगावला आहे.

जनतेच्या प्रश्नावर सरकार आंधळे-बहिरे

नागपुर मध्ये एकाच दिवशी दिवसाढवळ्या चार लोकांची हत्या (Nagpur Murder Case) केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) हे नागपूरचेच आहेत. शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेची (Law and Order) ही स्थिती आहे तर राज्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सरकार तरुणांना नोकऱ्या देत नाही आणि दुसरीकडे ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून तरुणांना बरबाद केले जात आहे, अशी टीका पटले यांनी केली.

देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे. सत्तेत बसलेले लोक फक्त मलई खाण्यावर लक्ष देत आहेत.
राज्यातील जनतेच्या मुळ प्रश्नावर हे सरकार आंधळे, बहिरे आहे.
या सरकारचे डोळे उघडण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे
नाना पटोले म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Soumyadeep Banerjee Takes the Helm as Director of F&B at Radisson Blu Plaza Hotel Banjara Hills Hyderabad