बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मेव्हणी, मोठ्या बहिणीला म्हणाली – ‘मी दाजींच्या नावानेच कूंकू लावणार, तूला शोधावा लागेल दूसरा पर्याय’

पोलीसनामा ऑनलाईन : आपल्या दाजींच्या प्रेमात एक मेहूणी इतकी वेडी झाली की तिने आपल्या बहिणीच्या वैवाहिक जीवनात आग लावली. तिची वागणूक पाहून तिचे कुटुंबही त्रस्त झाले. वडिलांना पाहून मुलीने पोलिसांना बोलावले. पोलिस स्टेशनमध्ये, तरूणीनेे म्हंटले की, मोठ्या बहिणीचे घर तुुटल्यास तिला फरक पडत नाही, तिला फक्त तिच्या दाजींच्या नावाने सिंदूर लावायचे आहे. याशिवाय तिला आणखी काही नको. मुलीने वडिलांना स्टेशनवरून घरी परत जाण्यास भाग पाडले.

तरूणी आणि तिच्या दाजींची प्रेमकथा चर्चेत आहे. माढोला पोलिस स्टेशन परिसरात लाईनमध्ये राहणाऱ्या एका युवतीचे चार वर्षांपूर्वी अमरोहा येथील एका युवकाशी लग्न झाले होते. जोडपे मुलाचे पालक आहेत. काही दिवसांपूर्वी महिलेेेेला समजले की, तिच्या नवऱ्याचे आणि बहिणीचे प्रेमसंबंध आहे. तिने तिच्या पतीच्या आणि बहिणीच्या अवैध संबंधांचा विरोध केला. तिने माहेरी वडिलांना हकीकत सांगितली. प्रकरण गांभीर्याने घेत नातेवाईकांनी लहान बहिणीचे हात पिवळे करण्याचा निर्णय केला. येथे मेेहूूणी पाकबड्यात भाड्याने खोली घेऊन राहू लागली. तिथे मुलगी एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेते. अभ्यासाच्या बहाण्याने तिने बहिणीच्या नवऱ्याशी संबंध चालू ठेवले. नातेवाईकांनी तरूणीसाठी तीन स्थळे आणली, परंतु तिने नकार दिला.

मुलीचे वडील मुलीच्या खोलीत पोहोचले. त्यांनी मुलीला आपल्याबरोबर घरी येण्यास सांगितले. वडिलांचा प्रस्ताव ऐकताच तरूणी भडकली. तिने त्वरित यूपी 112 ला फोन केला. पोलिस घटनास्थळी गेले. नात्यातील चढउतार पाहून पोलिस प्रमुख चक्रावले. दोघांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेथील पोलिसांच्या उपस्थितीत पंचायत सुरू झाली. पिडीत मोठ्या बहीणीने लहान बहिणीला हात जोडून विनवणी केली की, माझे घर फोडू नको. माात्र, युवतीने सांगितले की तिला दाजींसोबतच लग्न करायचे आहे. पर्याय तुला शोधाावा लागेल. ज्यानंतर पिडीत महिला आणि वडील हताश होऊन पोलिस ठाण्यातून परत आले.