CBSE Board : आणखी परीक्षा केंद्र बनवणार, तणावग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

नवी दिल्ली : सीबीएसईच्या बोर्ड परीक्षांसाठी यावेळी देशभरात मागच्या वेळेच्या तुलनेत जास्त परीक्षा केंद्र बनवली जातील. बोर्ड परीक्षांच्या दरम्यान जर एखाद्या विद्यार्थ्याला तणाव जाणवत असेल तर तो ‘मनोदर्पण’ पोर्टल तसेच हेल्पलाइन नंबर 844-844-0632 चा वापर करू शकतो. या वर्षी सीबीएसईने हा सुद्धा निर्णय घेतला आहे की, 10वी आणि 12वी वर्गासाठी प्रॅक्टिकल एग्झाम आणि लेखी परीक्षांची शेवटची तारीख एक असू शकते.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले, शिक्षणासह सुरक्षा या सिद्धांताचे पालन करत सीबीएसई प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय करेल. मी तुम्हाला विश्वास देतो की, बोर्ड परीक्षा, जेईई आणि नीट परीक्षा दक्षतेसह आयोजित केल्या जातील. सीबीएसई परीक्षांच्या वेळी विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरणासाठी, तसेच त्यांचा अभ्यास प्रभावित होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.

बोर्ड परीक्षा 4 मेपासून 11 जूनदरम्यान करण्याचा निर्णय
बोर्ड परीक्षांची तयारी आणि परीक्षांच्या मुल्यांकनावर माहिती देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले, मी तुम्हाला विश्वास देतो की, सीबीएसई विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करण्यासाठी लेखी आणि प्रॅक्टिकल एग्झाम आयोजित करून विद्यार्थी आणि स्कूलला सर्व सहकार्य करू. कोरोना महामारीमुळे सरकारला सुमारे 10 महिने शाळा बंद ठेवाव्या लागल्या, ज्यामुळे शिक्षण मंत्रालयाने यावर्षी बोर्ड परीक्षा 4 मेपासून 11 जूनच्या दरम्यान घेण्याचे ठरवले.

प्रॅक्टिकल परीक्षा मार्चमध्ये घेतल्या जातील. बोर्ड परीक्षांच्या निकालाची घोषणा 15 जुलैच्या अगोदर केली जाईल. 10वीची परीक्षा 4 मेरोजी सुरू होऊन 7 जूनला संपेल, तर 12 वीची परीक्षा 4 मेरोजी सुरू होऊन 11 जूनला संपेल.

तणाव दूर करण्यासाठी वापरा हा टोल फ्री नंबर
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, जर कोणत्याही विद्यार्थ्याला तणाव जाणवत असेल तर तो ‘मनोदर्पण’ पोर्टलसह टोल फ्री नंबर 844-844-0632 चा वापर करू शकतो. तसेच सर्वांच्या अरोग्य सुरक्षेसाठी मार्गदर्शकतत्व जारी केली जातील. ज्यांचे सक्तीने पालन केले जावे.