‘ही’ 5 सरकारी Apps मोबाईलमध्ये असतील तर सहजरित्या बरीच कामे होतील

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आपण आपल्या घरातून बसल्या जागी आपल्या मोबाईलद्वारे बरीच महत्वाची कामे करू शकतो. आपल्याला घरबसल्या देश- विदेशातील घडामोडीची माहिती मिळत आहे. तसेच मोबाईल अ‍ॅप्सद्वारे काहीजण रिचार्जदेखील करतात, तसेच हॉटेलमधून अन्नपदार्थ आणि मेडिकलमधून औषध देखील मागता येत आहे.

अशा परिस्थितीत काही महत्वपूर्ण सरकारी अ‍ॅप्स आपल्या मोबाईमध्ये असलीच पाहिजेत. ज्याच्या मदतीने आपण बरीच सरकारी कामे करू शकतो. या प्रमुख अ‍ॅप्समध्ये मायगोव्ह, उमंग, एमपरिहवन, एमपासपोर्ट सेवा आणि आरोग्य सेतू आदींचा समावेश आहे. या अ‍ॅप्सद्वारे आपण कोणती कामे करू शकतो आणि त्यापासून आपल्याला कसा फायदा होईल, हे पाहू या.

MyGov App :  मोदी सरकारचा मायगोव्ह हा एक चांगला उपक्रम आहे. या डिजिटल माध्यमातून सामान्य लोक धोरणे तयार करण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि सरकारला सल्ला आणि सूचना देऊ शकतात. या फ्लॅटफार्मवर सरकारी योजनांची माहिती मिळू शकते आणि ते मंत्रालय आणि विविध विभागाशी संवाध साधू शकतात. या अ‍ॅपचे देशभरात 10 लाखापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

mParivahan :   रस्ते वाहतुक तसेच वाहतुकीचे नियम आणि त्यांच्या उल्लंघनावरी दंड यासंबधी माहितीसाठी सरकारने मोबाईल अ‍ॅप म्हणून एमपरिवनहन सुरु केले आहे. या अ‍ॅपवर आपल्याला ड्रायव्हिंग लायसेन्स तयार करणे, वाहनमालकाचे नाव, वाहननोंदणी तारीख, नोंदणी प्राधिकरण, वाहनवर्ग, विमा वैधता, फिटनेस वैधता आदीसह बरीच माहिती मिळू शकते. हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप असून याचे 30 लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत.

mPassport Seva :  पासपोर्टसेवा अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने एमपासपोर्ट नावाचे मोबाईल अ‍ॅप सुरु केले आहे. ज्याद्वारे सामान्य लोकांना पासपोर्ट अर्ज, पासपोर्ट सेवा केंद्र, पासपोर्ट बनवणे आणि सद्यस्थितीशी संबधित सर्व माहिती मिळू शकते. या अ‍ॅपद्वारे पासपोर्ट बनविणे खूप सोयीचे होते. भारतात एकूण 77 पासपोर्ट केंद्र आहेत. जिथे लोकांना पासपोर्ट मिळू शकतात. भारतातील 50 लाखाहून अधिक लोक या अ‍ॅपचा वापर करत आहेत.

UMANG :  उमंग ( (Unified Mobile Application for New-age Governance) हे अ‍ॅप डिजिटलायझेशनच्या दिशेने एक महत्वपूर्ण टाकलेले पाऊल आहे. ज्याद्वारे मोबाईलच्या मदतीने ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातात. या अ‍ॅपद्वारे लोकांना आरोग्यसेवा,वित्त, शिक्षण, गृहनिर्माण, उर्जा, शेती, वाहतूक तसेच रोजगार आणि कौशल्य आदी विषयी माहिती मिळते. या अ‍ॅपवर तुम्हाला आधार, डिजिलॉकर आणि पे गव्हर्नमेंट संबधित माहिती देखील मिळू शकते.

Aarogya Setu :  कोरोना महामारीच्या काळात लोकांना सर्वात जास्त गरजेचे असणारे अ‍ॅप म्हणजे आरोग्य सेतू होय. या अ‍ॅपद्वारे आपल्याला आसपासच्या कोरोनाबाधित तसेच आजारी लोकांची माहिती मिळू शकते. तसेच कोरोना केअर सेंटर, कोरोनाबाबत देश आणि जगभरातील माहिती ऑडिओ- व्हिडिओ, बातम्यांच्या रुपात मिळू शकते. मॉल किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करताना आरोग्य सेतू अ‍ॅप आहे की नाही याबाबत विचारणा केली जाते. यावरून हे अॅप किती महत्वाचे आहे,याची तुम्हाला कल्पना आली असेल. तुम्हीदेखील तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करा आणि कोरोनापासून दूर रहा.