समाजातील अनेक अमानुष, बेकायदा कृत्यांमध्ये मदर तेरेसांचा हात : तस्लिमा नसरीन

वृत्तसंस्था :

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला  काही दिवसांपूर्वी रांची मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या कर्मचाऱ्यांनी मूल विकले होते त्याप्रकरणी संस्थेच्या दोन नर्सेस ना अटक करण्यात आली होती. ही संस्था स्वतः मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. ” मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता असा गंभीर आरोप तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमधून केला आहे. असा प्रश्न वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केला आहे. मदर तेरेसा जी संस्था चालवत होत्या त्या संस्थेतून मुले विक्रीचा आरोप झाला, तसेच दोन सिस्टर्सना अटकही झाली. मात्र यामध्ये नवीन काय आहे? असेही आरोप तस्लिमा यांनी केला आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97e73505-8752-11e8-9d00-275373f127b0′]

काय आहे प्रकरण ?

मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या रांची येथील मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेवर चक्क नवजात अर्भकांची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला. आता मदार तेरेसांनीच स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये अशा प्रकारचे कृत्य घडत असल्याने या संस्थेला गालबोट लागले आहे. झारखंड येथील सरकारने या आरोपांची दखल घेत याप्रकरणाची अधिक चौकशी सुरु केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी दोन नर्ससहीत एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

मिशनरीज ऑफ चॅरिटी यासंस्थेने एका जोडप्याला मूल विकले होते. पण काही दिवसांनी संस्थेने विकलेले हे मूल परत आपल्या ताब्यात घेतले. मात्र या मुलासाठी जोडप्याने तब्ब्ल १. २० लाख रुपये मोजले होते. त्यामुळेच फसवणूक झाल्याचे  लक्षात येताच त्यांनी रांचीच्या बाल कल्याण समितीकडे मदर तेरेसांच्या संस्थेविरोधात तक्रार दाखल केली आणि हे धक्कादायक प्रकरण समोर आले.

मिशनरीज ऑफ चॅरिटीतर्फे अविवाहित मातांसाठी आश्रय गृह चालवले जाते. या आश्रय गृहातील एका महिलेच्या पोटी जन्माला आलेले मूल विकल्याचा काही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.
[amazon_link asins=’B0788KYFG4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d96e531-8752-11e8-b27d-13f49d62167f’]

आता या सगळ्या प्रकारावर वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी टीका करत हे सगळे प्रकार या संस्थेत कायमच चालले आहेत असा आरोप केला. तसेच मदर तेरेसा सुरूवातीपासूनच अनेक अमानुष आणि बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी होत्या असेही त्यांनी म्हटले आहे.