जाणून घ्या PGD आणि IVF उपचारांविषयी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक विवाहित महिलेचं स्वप्न असतं की, आपण आई व्हावं. परंतु काही कारणांमुळं अनेकदा प्रेग्नंसीत अडचण येते. अनेकदा अनुवांशिक दोष असल्यामुळंही मुलं न होण्याची समस्या येऊ शकते. परंतु आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाच अनेक उपचार केले जाऊ शकतात. ज्या महिला अनुवांशिक दोष असल्यानं आई होऊ शकत नाहीत त्या पीजीडी (PGD)आणि आयव्हीएफद्वारे (IVF) मातृत्वाचं सुख मिळवू शकतात.

विशिष्ट गुणसूत्र दोष असलेल्या जोडप्यांना प्री इम्प्लांटेशन अनुवांशिक निदान (पीजीडी) तसंच इन व्हिट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) ही उपचार पद्धती फायदेशीर ठरू शकते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

इन व्हिट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) म्हणजे काय ?

इन व्हिट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) म्हणजे एक जैविक प्रक्रिया आहे. आजकाल सर्वसामान्य दाम्पत्यांसाठी हा उपचार फायदेशीर ठरू लागला आहे. या प्रक्रियेत पुरुषांचे शुक्राणू आणि स्त्रीचे बीजअंड घेऊन प्रयोगशाळेत त्यांचं मिलन केलं जातं. त्यानंतर गर्भाशयात सुपित अंडी रोपण केली जातात. स्त्रीला अंडी परिपक्व करण्यासाठी आणि गर्धारणा करण्यासाठी तयार करण्यासाठी औषधं दिली जातात. त्यानतंर स्त्री गर्भवती होते.

प्री इम्प्लांटेशन जेनेटीक डायग्नोसिस (पीजीडी) म्हणजे काय ?

प्री इम्प्लांटेशन जेनेटीक डायग्नोसिस (पीजीडी) अनुवांशिक चाचणी ही गर्भधारणेपूर्वी इन व्हिट्रो फर्टीलायझेशन द्वारे केली जाते. याद्वारे गर्भातील बाळाला कुठलाही अनुवांशिक दोष नाही ना हे ओळखणं सोपं जातं. जेणेकरून वेळीच निदान करून बाळाला हा आजार होण्यापासून रोखता येऊ शकतं. पीजीडी व्हिट्रो फर्टीलायझेशनच्या सामान्य प्रक्रियेपासून सुरू होते ज्यात प्रयोगशाळेत अंडी पुनर्प्राप्ती आणि गर्भधारणेचा समावेश असतो.

पीजीडी निदान कोण करू शकतात ?

1) नात्यातील लग्न केलेल्या व्यक्ती
2) वारंवार रोपण अयशस्वी होणं
3) ज्यांना आयव्हीएफ उपचारात यश आलेलं नाही.
4) जनुकीय विकार असलेल्या व्यक्ती
5) वयाची पस्तीशी पार केलेल्या महिला
6) 40 वर्षांवरील पुरुष
7) वारंवार गर्भपात झालेल्या महिला

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.