MP Arvind Sawant On Rahul Narvekar | अरविंद सावंतांची अपात्रतेच्या कारवाईवरून नार्वेकरांवर टीका; म्हणाले – ‘सरड्यासारखा रंग बदलणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही’

पोलीसनामा ऑनलाइन – MP Arvind Sawant On Rahul Narvekar | राज्यातील शिवसेना शिंदे गट (Eknath Shinde Group) विरुद्ध ठाकरे गट (Thackeray Group) अशी लढाई ही मागील दीड वर्षापासून सुरु आहे. सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या कारवाईतील दिरंगाईवरुन फटकारल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधी पक्षातील अनेकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामाच्या संथगतीवर ताशेरे ओढले आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेसाठी कुठेही जाणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही अशा कठोर शब्दांमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. (MP Arvind Sawant On Rahul Narvekar)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई सध्या सुरु आहे. मात्र मे महिन्यामध्ये सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई सुरु केली नव्हती. या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिरंगाई चालू असल्याचे सुप्रिम कोर्टाने सुनावले आणि अध्यक्षांना कडक शब्दांमध्ये कारवाई सुरु करण्याचे देखील सांगितले. त्याचबरोबर येत्या आठवडाभरात कारवाईची कालमर्यादा निश्चित करावी, असे आदेशही विधानसभाध्यक्षांना दिले आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “अध्यक्षांना दिरंगाई शोभणारी आहे का?” असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. (MP Arvind Sawant On Rahul Narvekar)

पुढे ते म्हणाले की, “शहाण्याला शब्दांचा मार. सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली आहे. पण, अजूनही डोळे उघडले नाहीत. आधीच त्यांनी हजार पक्ष बदलले आहेत. सरड्यासारखे रंग बदलणारे ते आहेत. त्यामुळे न्याय, अन्याय, विचारांची बांधिलकी अशा लोकांना नसते. ते कुणाचेही नसतात. सत्तेसाठी कुठेही जाणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही. अध्यक्षांना दिरंगाई शोभणारी आहे का?” अशा शब्दांमध्ये खासदार सावंत यांनी राहुल नार्वेकर यांच्या सतत पक्षांतर करणाऱ्या नार्वेकर यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदार अरविंद सावंत यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचे दिसून
येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची टागंती तलवार आहे.
त्यामुळे भाजपाचा प्लॅन बी तयार असल्याचे देखील बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अपात्रतेच्या याचिकेबाबत हालचालींना वेग आला असून सर्व पक्षांना या
निर्णयाबाबत उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाधिवक्ता
तुषार मेहता यांच्यासह इतर कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी काल (दि.21) दिल्लीमध्ये उपस्थिती लावली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या आकाश सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 64 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून उत्कृष्ठ गणेश मंडळांना मिळणार बक्षीस

Sarathi Ganesh Utsav Guide 2023 | पुणे पोलिसांच्या ‘सारथी गणेश उत्सव गाईड 2023’ लिंकचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण