MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन सुरु असलेला वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. यावर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. आता पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे. यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये वादविवाद होताना पहायला मिळत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली आहे. या 40 आमदारांना गाडण्यासाठी लोक वाट पाहत आहेत, अशा शब्दात अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टीकास्त्र सोडले.

राज्यात विद्यमान परिस्थितीत खोटेगिरी सुरु असून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारने (State Government) घोषणा केलेला आनंद शिधा अद्याप मिळतोय, निदान तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावा अशी अपेक्षा अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी व्यक्त केली. तसेच या 40 आमदारांना गाडण्यासाठी लोक वाट पाहत आहेत, महाराष्ट्रातील जेव्हा निवडणुका होतील तेव्हा महाराष्ट्राची जनता या लोकांना आपली घर दाखवतील, अशा शब्दात सावंत यांनी 40 आमदारांवर टीकास्त्र सोडले.

निवडणूक संदर्भात न्यायालयीन लढाई सुरु असून 29 तारखेला काय होते ते पाहुयात. संतोष गावडे नावाच्या मुलाने 31 ऑक्टोबरला पत्र लिहिले आणि 31 ऑक्टोबर रोजीच या पत्राचे उत्तर आरटीआयच्या माध्यमातून आले आहे.
म्हणजे, ड्राफ्ट रेडीच होता. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी
ज्या पद्धतीने टाईमलाईन देऊन सत्ताधाऱ्यांची चिरफाड केली आहे, हिंमत असेल तर समोरासमोर या आणि बोला,
असे आव्हानही सावंत यांनी सरकारला दिले आहे.

Web Title :-  MP Arvind Sawant | people can wait to bury 40 mlas arvind sawant on shinde group mla

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणुक; सांगलीच्या मिलिंद गाढवे आणि निगडीतील अजय इंगळेवर FIR

Qala Movie | बहुचर्चित काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…