MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – MP Imtiyaz Jaleel | मागच्या 7 दिवसांपासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात औरंगाबादच्या नामांतराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गुरुवारी आंदोलकांकडून कँडलमार्च काढण्यात आला होता. या कँडलमार्चला पोलिसांची परवानगी नसताना देखील मोर्चा काढल्यामुळे सिटी चौक पोलिसांनी खासदार इम्‍तियाज जलील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (MP Imtiyaz Jaleel)

काही दिवसांपूर्वी केंद्र व राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात प्रक्रिया सुरु आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला खासदार जलील यांच्यासह काही संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे या सर्व संघटनानी एकत्र येत नामांतरविरोधी कृती समिती स्थापन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मागच्या 7 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. (MP Imtiyaz Jaleel)

या आंदोलनाचा एक भाग म्हणून खा. जलील यांच्या नेतृत्त्वात काल (गुरुवार) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय
ते भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला.
या कँडल मार्चची परवानगी काढण्यासाठी एमआयएमने पोलिस प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता.
मात्र गुरुवारी दुपारपर्यंत याला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही.
अखेर प्रशासनाची परवानगी नसताना लोकांनी खा. जलील यांच्या नेतृत्वात कँडल मार्च काढला.
या कँडल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, मुले, तरुणांसह वयोवृद्ध नागरिक यांचा समावेश होता.
यानंतर प्रशासनाकडून जमाव जमवणे आणि विनापरवानगी मोर्चा काढणे या अंतर्गत खासदार जलील यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title :  MP Imtiyaz Jaleel | chhatrapati sambhajinagar a case has been registered against mim mp imtiaz jaleel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani Crime News | तुझ्या मैत्रिणीसोबत आमची सेटिंग लावून दे म्हणत आरोपींकडून मुलीचा विनयभंग

Pune Crime News | बलात्कार करुन ब्लॅकमेल करुन जबरदस्तीने केले लग्न; नांदण्यासाठी येण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी