MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI | संजय राऊत यांच्याकडून भाजप आमदार व भीमा-पाटस सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपुर्वी पुणे जिल्हयातील (Pune District) दौंड तालुक्यातील (Daund Taluka) भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपचे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी देखील खा. राऊत यांनी केली होती, पण शिंदे-फडणवीस सरकारकडून (Shinde Fadnavis Govt) तसेच संबंधित तपास यंत्रणांकडून कुठलीच पावले उचलण्यात आली नाहीत. म्हणून खा. राऊत यांनी आता थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) लेखी तक्रार दाखल केली आहे. (MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI)

खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आज ट्विट करून सविस्तर माहिती दिली आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यातील काही कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी (Scam In Bhima-Patas Sugar Factory) मी केलेल्या तक्रारीकडे शिंदे-फडणवीस सरकार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मी आता थेट सीबीआयकडे दाद मागितली आहे. पुढे काय घडतं ते आपण पाहू असे संजय राऊत म्हणाले आहेत. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी मार्च 2023 मध्ये पंतप्रधान कार्यालयासह इतर ठिकाणी पत्र व्यवहार केला होता. (MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI)

तक्रार केल्यानंतर देखील भाजप आमदार राहुल कुल यांच्याकडे चौकशी झाली नाही तसेच राज्य सरकार
आणि संबंधित तपास यंत्रणा कुठलेच पाऊल उचलत नाहीत म्हणून अखेर संजय राऊत यांनी थेट सीबीआयकडे
लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नेमकी काय तक्रार केली आहे हे त्यांनी ट्विट करून सांगितले देखील आहे.

Web Title :-  MP Sanjay Raut – MLA Rahul Kul – Bhima-Patas Sugar Factory – CBI | Shivsena MP sanjay raut approches to cbi in bjp mla rahul kul bhima patas suger factory

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’

MLA Ravindra Dhangekar | ‘शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग, कारण…’, रविंद्र धंगेकरांचा टोला