MP Sanjay Raut | ‘हे विधिमंडळ नाही, ‘चोर’ मंडळ आहे’, संजय राऊतांची टीका; सदनात गदारोळ, हक्कभंग येणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधीमंडळ हे ‘चोर’ मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर निशाणा साधताना केले. मात्र, संजय राऊतांच्या (MP Sanjay Raut) विधानाचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) तिसऱ्या दिवशी उमटले. राऊतांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना गटाचे आमदार (Shivsena Group MLA) आणि भाजपचे आमदार (BJP MLA) आक्रमक झाल्याने सदनात गदारोळ झाला. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहाने (Legislative Assembly) हक्कभंग आणावा अशी मागणी केली. यानंतर गदारोळ सुरु झाल्याने कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्र विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ असं राऊतांनी (MP Sanjay Raut) शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. बनावट शिवसेनेने पदावरुन काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्यांची कागदपत्रे दाखवावीत, असं आव्हान त्यांनी दिलं. संसदेत पक्षनेते पदावरुन हटवले संदर्भात ते बोलत होते.

काय म्हणाले अतुल भातखळकर?

राऊत यांनी जो विधिमंडळाचा अपमान केला त्याबद्दल मी हक्कभंगाची सूचना दिली आहे.
त्यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे. त्यांनी सरळ म्हणलं आहे. त्यांनी गुंड मंडळ म्हटलं.
या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून (Yashwantrao Chavan) शरद पवारांपासून
ची (Sharad Pawar) उज्ज्वल परंपरा आहे. तरीही तुम्ही चोर मंडळ म्हणता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
आपण आजच्या आज हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा.
त्यावर तातडीने सुनावणी करा आणि बोलणाऱ्यांना शिक्षा करा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Web Title :-  MP Sanjay Raut | sanjay raut controversial statement on vidhan bhavan legislature creates chaos in maharashtra vidhan sabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Crime News | ठाण्यात शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्याकडून हत्या; फेरीवाल्यांच्या वादातून केली हत्या

Shiv Dhanushya Yatra | ठाकरे गटाच्या ‘शिवसंवाद’ आणि ‘शिवगर्जना यात्रे’ला शिंदे गटाकडून ‘शिवधनुष्य यात्रे’ने प्रत्युत्तर

Pune Crime News | रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल; महापालिकेची कारवाई