राज्य पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकांच्या 650 जागा, MPSC मार्फत होणार भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक कक्ष अधिकारी या वर्ग ‘ब’ च्या 806 जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या सर्वाधिक 650 जागांचा समावेश आहे. यासाठी उमेदवार 19 मार्च 2020 पर्यंत अर्ज करु शकतात.

महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘गट ब’ साठी संयुक्त पूर्व परीक्षा 3 मे रोजी राज्यातील 37 परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची 650 पदे आहेत. त्यापैकी महिलांसाठी 195, खेळाडूंसाठी 32 आणि अनाथांसाठी 6 पदे आरक्षीत आहेत.

पद आणि पदसंख्या –
1. सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) – 67 जागा
2. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) – 89 जागा
3. पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) – 650 जागा

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 मार्च 2020, 23.59 वाजेपर्यंत
शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त संस्थेची पदवी, मराठी भाषेचे ज्ञान
वयाची अट – 1 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय – 5 वर्ष सूट)
वेतनमान – 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये आणि इतर भत्ते
परिक्षा शुल्क – 374 रुपये (मागसवर्गीय/अनाथ – 274 रुपये)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
परिक्षा केंद्र – महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

असा करा अर्ज –
उमेदवार अर्ज करण्यासाठी https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. याच वेबसाइटवरुन उमेदवारांना परिक्षा शुल्क ऑनलाइन भरता येईल.
वय, शारीरिक अर्हता या संबंधित माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/05-2020.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.