Mucormycosis : तज्ज्ञांनी सांगितलं म्युकरमायकोसिस आजारामागील नेमकं कारण; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, कफ, डोळे-नाकात वेदना आणि लाली, श्वास लागणं, नाकावर काळा रंग दिसणं, मानसिक विभ्रम, रक्ताची उलटी अशी लक्षणे दिसू लागली. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. परंतु हि लक्षणे आढळली म्हणजे ब्लॅक फंगसच आहे असे नाही. यावर ठामपणे सांगणे कठीण आहे. तो बुरशीजन्य रोग आहे, हे खरं; पण तो ब्लॅक फंगसमुळे झालेला नाही. भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेत आढळलेला रोग हा म्युकरमायकोसिस Mucormycosis किंवा झायकोमायकॉसिस आहे. तो म्युकरमायसीट्स नावाच्या बुरशीच्या गटामुळे झालेला आहे.

बुरशी म्हणजे काय ?
ज्यात यीस्ट्स, मोल्ड्स आणि मशरूमचा समावेश असतो अशा जीव म्हणजे बुरशी होय. जैविक वर्गीकरणानुसार त्यांचा गट वनस्पती, प्राणी आणि प्रोटोझोआ यांच्यापेक्षा वेगळा असतो. बहुतांश प्रकारची बुरशी निरुपद्रवी असते. त्यातील काही बुरशी आपल्या आजूबाजूलाही आपण पाहत असतो. ओल्या भिंती, काही वनस्पती, माती, झाडांची गळलेली पानं आदींवर हि बुरशी आढळतात. अशा बुरशीशी लढण्याच्या दृष्टीने हेल्दी माणसाची रोगप्रतिकारक यंत्रणा तयार असते.

ब्लॅक फंगस आणि म्युकरमायसीट्समध्ये काय फरक आहे ?
हळू वाढणारी आणि पिग्मेंट तयारी करणारी बुरशी म्हणजे ब्लॅक फंगस. तिला ब्लॅक यीस्ट म्हणूनही ओळखलं जातं. या बुरशीचा आजार त्वचेच्या विकारामुळे किंवा सिस्टिक फायब्रॉसिस असल्यास किंवा श्वासातून शरीरात गेल्यास होऊ शकतो. म्युकरमायसीट्समध्ये नाक आणि चेहऱ्यातल्या सायनसेसना, आतड्यांना आणि मेंदूला संसर्ग करण्याची क्षमता असते.

म्युकरमायकोसिसची समस्या किती मोठी आहे ?
म्युकरमयकोसिस Mucormycosis हा आजार आताच उदभवला आहे असे नाही यापूर्वीही हा आजार होता.
दरवर्षी तो एक लाखांमागे १४ जणांमध्ये आढळत.
या आजारासंदर्भात जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत अभ्यास करण्यात आला होता.
त्यानुसार भारतात म्युकरमायकोसिसच्या केसेसमध्ये किंचित वाढ झाली होती.
मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेत या रोगाचे प्रमाण वाढले असून देशात सुमारे ११ हजार केसेस आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिसला एपिडेमिक डिसीज म्हणून घोषित केलं आहे.
एप्रिल आणि मे या कालावधीत भारतात १.६ कोटी कोरोनाबाधित आढळून आहे.
त्या कालावधीतच म्युकरमायकोसिसचे ११ हजार रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्येपेक्षा म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या तुलनेत अत्यंत कमी आहे, पण ज्यावेळी कोरोना रुग्णामध्ये ज्यावेळी म्युकरमायकोसिस आढळतो त्यावेळी त्याचे स्वरूप गंभीर होते.
त्यात मृत्युदर ५० टक्के आहे. त्यामुळे त्या रोगाला एपिडेमिक म्हणून घोषित केलं आहे.
चुकीने ब्लॅक फंगस म्हणून म्युकरमायकोसिसला समजलं गेल्यामुळे काही लोकांमध्ये भीती निर्माण झाली.
तरीही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि प्रत्येक कोरोना रुग्णाला म्युकरमायकोसिस होईल असे नाही.

म्युकरमायकॉसिसचा धोका कोणाला ?
ज्यांचा डायबेटीस अनियंत्रित आहे, ज्यांना एचआयव्ही किंवा कॅन्सरवरचे उपचार सुरू आहेत, स्टेरॉइड थेरपी सुरू आहे, ज्या व्यक्ती बराच काळ आयसीयूमध्ये आहेत आणि एकंदरीतच ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता आहे.

म्युकरमायकोसिस आहे, असं केव्हा मानावं ?
मध्यम ते गंभीर स्वरूपाचा कोरोना असेल तर म्युकरमायकोसिसचा Mucormycosis धोका असू शकतो. हेल्दी व्यक्ती किंवा सौम्य कोरोना असलेल्यांनी भीती बाळगण्याची गरज नाही. डोळे, नाक यांमध्ये वेदना किंवा लालसर होणं, ताप, नाक चोंदणं, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त स्राव बाहेर येणं, गालाच्या हाडांवर वेदना एका बाजूने चेहऱ्याला वेदना, सूज, बधीर होणं, दातदुखी, दात सैल होणं, वेदना आणि धूस दिसणं, त्वचेवर चट्टे, छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, मानसिक त्रास, विसरायला होणं यापैकी लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

म्युकरमायकोसिसवर उपचार
म्युकरमायकोसिसवर Mucormycosis उपचार करताना अँफोटेरिसिन बी यासारख्या औषधाचा उपयोग केला जातो. गंभीर रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तसंच स्टेरॉइड्सचा वापर कमी करणं गरजेचं आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिसला प्रतिबंध करण्यासाठी काही नियम म्हणा किंवा पथ्ये पाळणे गरजेचे आहे.
त्यामध्ये बाहेर जाताना मास्क घालणे, बूट घालणं, मातीकाम करताना किंवा धुळीच्या संपर्कात येताना फुलपँट घालणं, फुलशर्ट घालणं, रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं, . प्रत्यक्ष लक्षणं दिसल्याशिवाय अँटीफंगल औषधं घेऊ नयेत.
कोणतीही लक्षणं दिसली, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

पुढे काय ?
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाची लाट ओसरत आहे.
त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या वाढीचा अभ्यास करणं सध्या महत्त्वपूर्ण बनले आहे.
हा आजऱही आटोक्यात येईल.
पण गाफील राहून चालणार नाही.
हेल्दी लोकांना हा आजार होणार नाही पण ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना हा जर होऊ शकतो त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी.
लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…