Multibagger Return | ‘या’ पेनी टोकनने 7 दिवसात गुंतवणुकदारांना बनवले अरबपती, 1000 रुपयांचे झाले 2,989 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Return | क्रिप्टोकरन्सी बाजार (Crypto market) जोखमींनी भरलेला आहे. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या बाबतीत काहीही सांगता येत नाही, क्वचितच कोणी त्याचा अंदाज लावू शकतो. असे म्हटले जाते की, येथे हात लावताच मातीचे सोने होऊ शकते, आणि हातात असलेल्या सोन्याची सुद्धा माती होऊ शकते. आजकाल क्रिप्टो मार्केटमध्ये रिकव्हरी सुरू आहे, याच दरम्यान आणखी एका ‘अनामिक’ क्रिप्टो टोकनने (Crypto Token) त्याच्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक रिटर्न देत धक्का दिला आहे. (Multibagger Return)

 

गुंतवणूकदार 7 दिवसात झाले करोडपती
या अनामिक क्रिप्टो टोकनचे नाव आहे – एकता (Ekta). सध्या या टोकनबाबत फारसे काही स्पष्ट नसले तरी गेल्या सात दिवसांत या टोकनने दिलेल्या मल्टीबॅगर रिटर्न्समुळे ते निश्चितच चर्चेत आहे.

 

coinmarketcap.com च्या मते, एकताने गेल्या सात दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 2,893,266,376 टक्के इतका मोठा परतावा दिला आहे. याचा अर्थ या टोकनने 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 2,989.32 कोटी रुपयांमध्ये केले आहे.

जाणून घ्या क्रिप्टो टोकन बद्दल –
एकता हे एक ब्लॉकचेन चलन आहे. त्याने अलीकडेच सीड फंडिंग आणि खाजगी विक्रीतून 5 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त जमा केले.
तथापि, या टोकनचे मार्केट कॅप 5 दशलक्ष पेक्षा कमी आहे. ट्रेड व्हॉल्यूममध्ये 92 टक्के घट झाली आहे.
coinmarketcap वरील डेटा दर्शवितो की या क्रिप्टोकरन्सीचे टोटल सप्लाय 12,097,924 आहे आणि कमाल मर्यादा 420,000,000 टोकन आहे. (Multibagger Return)

 

भारतातील क्रिप्टो मार्केट (Crypto Market in India)
संपूर्ण जगात भारत Crypto ची सर्वात मोठी बाजारपेठ आहे
आणि भारतातील जितक्या लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही त्यापेक्षा कितीतरी पट अधिक लोकांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली आहे.
भारतात सुमारे 100 कोटी क्रिप्टो गुंतवणूकदार आहेत. सध्या येथे क्रिप्टोवर कोणतेही रेग्युलेशन किंवा बंदी नाही.

 

(डिस्क्लेमर : येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, Share Market / Crypto Market मधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Return | cryptocurrency ekta has delivered 2 arab percent in seven days 10k turn to 2 crore check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Former MLA Mohan Joshi | रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख काँग्रेस करणार आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

 

Beed Crime | 30 वर्षीय ‘कल्याणकारी’ विवाहीत महिलेचं युवकाशी जुळलं सूत, नवर्‍याला ‘लफडं’ समजलं अन् भलतंच घडलं

 

Hingoli Crime | 13 वर्षाच्या मुलीला पळवून नेत केला अत्याचार, आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी