Multibagger Stock | 42 वरून 800 रूपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदार झाले मालामाल ! 1 लाखाचे झाले 19 लाख रुपये, तुमच्याकडे आहे का?

नवी दिल्ली – Multibagger Stock | सध्या शेयर बाजार (Stock Market) नवीन विक्रमावर आहे. अनेक छोटे-मध्यम शेयर्स मल्टीबॅगर (Multibagger Stock) ठरत आहेत. असाच एक मल्टीबॅगर शेयर आहे ठRaghav Productivity Enhancers. राघव प्रोडक्टिव्हिटी एहान्सरच्या स्टॉकने (Raghav Productivity Enhancers Stock) मागील पाच वर्षात शेयरधारकांना 1,829% रिटर्न दिला आहे.

हा मायक्रोकॅप शेयर (Small cap share) 2 ऑगस्ट 2016 ला 42.5 रुपये होता, आता तो बीएसईवर वाढून 820 रुपयांवर गेला. 6 सप्टेंबर 2021 ला हा शेयर 804.80 रुपयांवर बंद झाला.

या हिशोबाने जर एखाद्या गुंतवणुकदाराने 2016 मध्ये या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्यास आज 19.29 लाख रुपयांचा रिटर्न मिळाला असेल. याच्या तुलनेत सेन्सेक्सचा रिटर्न 101% राहिला आहे.

 

राकेश झुनझुनवाला करणार गुंतवणूक

Raghav Productivity Enhancers ने 2 सप्टेंबरला सांगितले होते की, दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यामध्ये 6 लाख अनसिक्युअर्ड कम्पल्सरी कन्व्हर्टेबल डिबेंचर (CCDs) खरेदी करतील.

या शेयरची व्हॅल्यू 30.9 कोटी रुपये होईल. शेयरमध्ये मागील काही दिवसांत तेजी होती. परंतु 6 सप्टेंबरला हा अर्धा टक्का घसरणीसह 804.80 रुपयांवर बंद झाला आहे. Raghav Productivity Enhancers चा शेयर आपल्या 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरी मूव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या वर व्यवहार करत आहे.

 

एका वर्षात 627.36% वाढली शेयर प्राईस

सध्याच्या सत्रात, राघव प्रोडक्टिव्हिटी एनहान्सरचा शेयर बीएसईवर 809 रुपयांच्या मागील बंदच्या तुलनेत 820 रुपयांच्या उच्चस्तरावर पोहचला.
बीएसईवर एकुण 1,915 शेयर्सने 15.36 लाख रुपयांचा व्यवहार केला. शेयर 6 सप्टेंबरला 0.37% च्या वाढीसह 812 रुपयांवर उघडला होता.
या वर्षाच्या सुरूवातीला स्टॉक 228.33% वाढला आहे आणि एक वार्षत 627.36% वाढला आहे.

Web Title : Multibagger Stock | multibagger stock raghav productivity enhancers gave 1829 percent return in five year check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Lockdown | …तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागतील; मंत्री विजय वडेट्टीवार

Pune Corporation | मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची सभागृह नेत्यांकडून झाडाझडती, गणेश बिडकर म्हणाले – ‘आगामी काळात शिक्षणाचे सर्व विषय शिक्षण समितीसमोर आणावेत’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 218 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी