Mumbai Crime News | धक्कादायक ! तृतीयपंथीयाने चिमुरडीला जिवंत पुरले; कुटुंबीयांनी पैसे न दिल्याच्या रागात अपहरण करून केली हत्या

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Mumbai Crime News । बाळाला आशीर्वाद दिल्यांनतर पैसे आणि साडी दिली नाही, या रागाने एका तृतीयपंथीयाने 3 महिन्यांच्या बाळाचे अपहरण (Kidnapping) करत त्याला खाडीत जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या चिमुरडीचा एका लहानशा कुटुंबात जन्म झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) कफ परेड (Cuff Parade) याठिकाणी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तृतीयपंथीय कन्हैया चौगुले उर्फ कन्नू (वय, 30) आणि त्याचा साथीदार सोनू कांबळे (वय, 22) यांना अटक केलीय. Mumbai Crime News | mumbai transgender kills 3 month old after parents say no gifts

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत अधिक माहिती अशी की, चितकोटे कुटुंबीयांतील (Chitkote family) 3 महिन्यांपूर्वी चिमुरडी आर्याचा जन्म झाला. त्या घरात आधी एक मुलगा आणि आता आर्याचा (Arya) जन्म झाला होता. त्यामुळं कुटुंब आनंदी होतं. तीन महिन्यांची आर्या आईवडिलांसोबत राहत होती. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी शेजारी राहणाऱ्या तृतीयपंथी कन्नू (Kannu) त्यांच्या घरी आला. त्यानं आशीर्वाद देत मुलीच्या जन्मानिमित्त एक साडी, नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी केली. परंतु, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ती मागणी पूर्ण करणे चितकोटे कुटुंबीयांना शक्य नसल्याने त्यांनी त्याला नकार दिला. या करणावरूनच त्यांच्यात वाद उफाळला. त्यानंतर कन्नू तेथून निघून गेला.

या दरम्यान, रागावलेला कन्नू आपल्या घरी बसला असताना त्याचा मित्र सोनू तेथे गेला. कन्नूने घडलेला प्रकार सांगून आपला अपमान झाल्याचे सोनूला सांगितले. त्यांनतर दोघांनी चितकोटे कुटुंबीयांना धडा शिकविण्याचे ठरवले. बदला घेण्यासाठी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. त्यावेळी कन्नूने (Kannu) चिमुरडी आर्याचे अपहरण केले आणि सोनू कांबळेच्या (Sonu Kamble) मदतीने आंबेडकरनगर (Ambedkar Nagar) भागात खाडी ठिकाणी बाळाला जिवंत पुरले. काही वेळाने मुलगी घरातून गायब झाल्याचे कळताच चितकाेटे कुटुंबीयांनी कफ परेड पोलिसांत (Cuffe Parade Police Station) तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत शोध सुरु केला. चौकशीच्या वेळी चितकोटे कुटुंबीयांकड़ून कन्नूसोबत घडलेला प्रसंग समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर त्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे.

Web Title : Mumbai Crime News | mumbai transgender kills 3 month old after parents say no gifts

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

cyber fraud | चीनमध्ये बसलेले ठग भारतीयांना लावत आहेत ऑनलाइन चूना, दारू-मसाल्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांना फसवले

Gold News | खुशखबर ! 12 जुलैपासून मिळणार स्वस्त सोने, सरकार देईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कोणत्या दराने मिळणार?

Petrol and diesel price today | पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर