अंधेरी न्यायालयाचे कंगना राणौतला ‘वॉरंट’ !

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणौत ही अनुपस्थित राहिली. त्यामुळे अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी कंगना राणौत हिच्याविरोधधात जामीनपात्र वॉरंट जारी केले.

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या तारखेला कंगना हजर राहिली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने तिला समन्स बजावले होते. तरीही आज ती न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

यावेळी तिच्या वकिलांनी आम्हाला समन्सला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी २६ मार्च रोजी निश्चित केली आहे.