Mumbai News : बारमध्ये एकाच वेळी 64 ग्राहक ओढत होते हुक्क्याचे ‘कश्श’

मुंबई (Mumbai) : अंधेरी येथील आर्बर २८ ऑल डे किचन अँड बारमध्ये पोलिसांनी छापा टाकला असता तेथे तब्बल ६४ ग्राहक हुक्क्याचे कश्श घेताना आढळून आले. पोलिसांनी या ६४ ग्राहकांसह मालक, मॅनेजर, कॅशियअर, ३ सुपरवायजर, ६ वेटर, २ बार टेंडर, ३ डी जे चालक अशांना अटक केली आहे. अंधेरी पश्चिममधील वीरा देसाई इंड्रस्ट्रिअल इस्टेटमध्ये तळमजल्यावर आर्बर २८ ऑल डे किचन अँड बार हा बार आहे़ तो नावाप्रमाणेच संपूर्ण दिवसभर उघडा असतो.

तेथे हुक्का पुरविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील तसेच सीआययु प्रभारी सचिन वाझे व त्यांच्या पथकाने या बारवर छापा टाकला. तेव्हा संपूर्ण बार गच्च भरला होता. डी जेचा मोठ्या आवाज सुरु होता. वेगवेगळ्या टेबलवर हुक्का पॉट, तंबाखुजन्य हुक्का फ्लेअवर, सिगारेट व इतर साहित्य ग्राहकांना पुरविले जात होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.