Mumbai-Pune Expressway Accident | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्यावर 3 वाहनांचा भीषण अपघात, पोलीस कर्मचारी जखमी

खालापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मडप टोलनाक्याजवळ तीन वाहनांची विचित्र अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला आहे. यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात कार्यरत असणारा एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital, Kamothe) उपचार सुरु असल्याचे समजतेय. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक ट्रक यु टर्न घेत असताना हा अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला आहे.

खालापूर येथील पुलाखाली मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. ट्रक (Truck), होंडा सिटी कार (Honda City car) व स्विफ्ट डिझायर (Swift Desire) या तीन वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.
स्विफ्ट डिझायर गाडी मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई चालवत होते. तर दुसऱ्या गाडीमध्ये एक कुटंब होते.

या अपघातात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी (Highway police) घटनास्थळी धाव घेतली.
तसेच खालापूर पोलीस ठाण्यातील (Khalapur Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.

 

Web Title : Mumbai-Pune Expressway Accident | 3 vehicles crash at Pune-Mumbai Expressway at Khalapur toll plaza, police personnel injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | मोक्कामध्ये फरार असलेल्या गायकवाड बाप-लेकावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

Cotton Global Market Prices | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! जागतिक बाजारात 7 वर्षाच्या उच्चस्तरावर पोहचले कापसाचे दर

Pune Corporation | स्थायी समितीचे ‘वराती मागुन घोडे’ ! प्रशासनाची वर्षभरापासून ‘कार्यवाही’ स्थायी समितीचा निर्णय आता