Mumbai Railway Megablock | लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी; मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन- दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून मुंबईच्या मध्य रेल्वेवर लाईनवर (Central Line) 27 तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Railway Megablock) घेण्यात येणार आहे. सीएसएमटी (CSMT) ते मशीद बंदर (Masjid Bandar) रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक झाले ला कर्नाक उड्डाणपुल पाडला जाणार आहे. त्यामुळे, मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकलच्या फेऱ्या रद्द (Mumbai Railway Megablock) केल्या आहेत.

दरम्यान, या वेळेत चालणाऱ्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुल (Carnac Bridge) पाडण्याबरोबरच कोपरी पुलाच्या कामासाठीही लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हा मेगाब्लॉक (Mumbai Megablock) शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून सुरू होईल. काही उपनगरीय गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी भायखळा (Bhaykhala) ते ठाणे (Thane) दरम्यान धावतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यासंदर्भात माहिती देताना म्हणाले,
“आम्ही 27 तासांचा मेगाब्लॉक कर्णक पूल पाडण्यासाठी घेत आहोत, मात्र आम्ही मुख्य मार्ग आणि हार्बर
मार्गावरील (Harbour Line) सेवा निर्धारित वेळेपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करू. आम्ही मुख्य मार्गावरील
आमचं काम पूर्ण करण्याचा आणि दुपारी 4 वाजेपर्यंत सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू, तसेच हार्बर
मार्गावरील सेवाही आम्ही 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

Web Title :- Mumbai Railway Megablock | mumbai local megablock updates central railway attention 27 hours megablock on central railway line from 19th to 20th november

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Leader Ranjit Deshmukh | काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी मंत्र्याची मुलगा आणि सूनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारने लावला ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका

Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?