मुंब्रा : अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली अन् पत्र्याच्या पेटीमुळं खूनाचा पर्दाफाश, प्रियसीनं भावाच्या मदतीनं काढला काटा

मुंब्राः दिवा-शिळ रस्त्या जवळील खाडी पुलानजीक गुरुवारी संध्याकाळी पत्र्याच्या पेटीमध्ये सडलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्याचा उलगडा करण्यास शिळ-डायघर पोलिसांना यश मिळाले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून दिव्यातील मनीष यादव यांचा हा मृतदेह आहे. दरम्यान लग्नास नकार दिल्याने मनीष यांच्या प्रियसीने भावाच्या मदतीने डोक्यात हातोडा मारून मनीषचा खून केला त्यानंतर पत्र्याच्या पेटीत मृतदेह घालून ती पेटी चिखलात फेकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिता यादव व तिचा भाऊ विजय भल्लारे (रा.नथानी टाँवर,लेबर कँम्प,मुंबई सेट्रल) यालाल ताब्यात घेतले आहे.

दिवा-शिळ रस्त्या जवळील खाडी पुलानजीक पेटित मृतदेह आढळून आला होता तो कोणाचा आहे. याबाबत माहिती मिळवणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृतदेह ज्या पेटीमध्ये आढळून आला होता.तशा पेट्याची विक्री आणि उत्पादनाच्या ठिकाणांची तपासणी सुरु केली. मुंबईतील धारावी येथील डांबर कम्पाउंड येथे मृतदेह असलेली पेटी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्या उत्पादकाचा शॊध सुरु केला. तो मिळाला त्याने ३० एप्रिलला एका महिलेने पेटी खरेदी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या महिलेसंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली असता तिचा मोबाईल नंबर मिळवण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला असता तो नवी मुंबईतील घनसोली परीसरात अँक्टीव्ह असल्याचे माहिती मिळाली.तेथे जाऊन पोलिसांनी अनिता यादव या महिलेला ताब्यात घेतले असता तीने तीचा भाऊ विजय भल्लारे याच्या मदतीने मनिष यादव याच्या खुनाची कबुली दिली. अनिता आणि मनीष यांचे दिड वर्षापासून शारीरिक संबध होते, त्यानंतर लग्न करण्यास मनीषने नकार दिला होता. त्यामुळे ६ मे ला मनीषच्या घरी भावाला घेऊन जाऊन त्याच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करुन त्याची हत्या केली.त्यानंतर पेटीत मृतदेह भरुन खाडीजवळील झाडाझुडपात फेकून दिल्याची कबुली अनिताने दिली.